चामोर्शी-आष्टी मार्गावर भीषण अपघात; स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

स्कॉर्पिओ व दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात (Accident in Chamorshi) दुचाकीचालक ठार झाला. ही घटना चामोर्शी-आष्टी मार्गावर सोनापूरजवळील धाब्याजवळ बुधवारी (दि. 25) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.

    चामोर्शी : स्कॉर्पिओ व दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात (Accident in Chamorshi) दुचाकीचालक ठार झाला. ही घटना चामोर्शी-आष्टी मार्गावर सोनापूरजवळील धाब्याजवळ बुधवारी (दि. 25) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. खालीद नीलकंठ गेडाम (35, रा. नागपूर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, चामोर्शीवरून नागपूर चक येथे खालीद हा आपल्या (एमएच 33 आर 2851) दुचाकीने जात होता. विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कॉर्पिओने (एमएच 11 सीजी 3348) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये खालीद जखमी झाला. जखमी खालीदला स्वारास स्कार्पिओ चालक अलोकेश सुजित सरदार ( 24, रा. जामगिरी) याने स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

    घटनेसंदर्भात पोलिस स्टेशन चामोर्शी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनात पोहवा सत्यविजय रामटेके करत आहेत.