बीड बायपासवरील गोदावरी टी उड्डाणपुलावर भीषण अपघात; कार-दुचाकी अपघातात तरुण ठार

बीड बायपासवरील गोदावरी टी उड्डाणपुलावर बेंबडे हॉस्पिटलसमोर झालेल्या कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि.३) रोजी रात्री ९ च्या सुमारास अपघात घडला. भाऊसाहेब गोरख निकम (३१, रा. देवपूर, ता. कन्नड), असे मृत तरुणाचे नाव आहे.

    छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासवरील गोदावरी टी उड्डाणपुलावर बेंबडे हॉस्पिटलसमोर झालेल्या कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि.३) रोजी रात्री ९ च्या सुमारास अपघात घडला. भाऊसाहेब गोरख निकम (३१, रा. देवपूर, ता. कन्नड), असे मृत तरुणाचे नाव आहे.

    निकम यांचा भाऊ बीड बायपासवरील नाईकनगरात राहतो. ३ फेब्रुवारी रोजी भावाला भेटण्यासाठी ते दुचाकीने महानुभाव आश्रम चौकाकडून नाईकनगरकडे जात होते. बेंबडे हॉस्पिटलच्या समोर गोदावरी टी उड्डाणपुलावर त्यांची दुचाकी येताच झाल्टा फाटा येथून एमआयटी चौकाकडे जाणाऱ्या कारला (एमएच २०, एफयू ८९२५) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात निकम यांची दुचाकी कारला धडकली.

    या अपघातात निकम यांच्या डोक्याला जबर मार लागला. अपघाताची माहिती मिळाल्यावर उपनिरीक्षक सूरज जारवाल, सर्जेराव सानप यांनी त्यांना घाटीत दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सातारा ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.