मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूर ब्रीजवर भीषण अपघात; १४ जखमी

कोकणातून मुंबईचा परतीचा प्रवास करताना प्रवाशांना अपघात झाला आहे. ट्रॅव्हलर खेडवरून मुंबईतील सांताक्रूझकडे येत होती. मात्र, पेण जवळील हमरापूर ब्रीजवर बंद पडलेल्या कॉईल ट्रेलरला मागून धडक दिल्याने अपघात घडला आहे.

    पेण : रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) हमरापूर फाटा येथील ब्रिजवर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हलर आणि ट्रेलरमध्ये अपघात (Accident) झाला. या अपघातात ट्रॅव्हलरमधील एकूण २२ प्रवाशांपैकी १४ जण जखमी झाले आहेत.

    कोकणातून (Konkan) मुंबईचा (Mumbai) परतीचा प्रवास करताना प्रवाशांना अपघात झाला आहे. ट्रॅव्हलर खेडवरून मुंबईतील सांताक्रूझकडे येत होती. मात्र, पेण जवळील हमरापूर ब्रीजवर बंद पडलेल्या कॉईल ट्रेलरला (Coil Trailer) मागून धडक दिल्याने अपघात घडला आहे.

    ट्रॅव्हलरमधील जखमींमध्ये चालक सागर दिलीप गुरव (३१), प्रतिभा महेश देवळे (३०), रंजना दीपक भुवड (२५), मीनल काशिनाथ देवळे (२५), काशिनाथ पांडुरंग देवळे (५०), सुरेश सखाराम नाचरे (४०), प्रवीण काशिनाथ नाचरे (३४), मंगेश मधुकर देवळे (४१), स्वप्निला काशिनाथ देवळे (४७), संजना संजय पाटील (३४), समृद्धी संजय पाटील (१४), दीपक गंगाराम भुवड (३०), श्वेता सुनील भुवड (३५), संजना सुरेश नाचरे (३५), सदर अपघातग्रस्तांना कल्पेश ठाकूर यांनी रुग्णवाहिकेतून तात्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.