मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कार आणि टेम्पोचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर दोघे जखमी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) बोरज गावच्या हद्दीत एक आयशर टेम्पो व कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार झाले तर दोघे जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास (Accident in Lanavala) झाला.

    लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) बोरज गावच्या हद्दीत एक आयशर टेम्पो व कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार झाले तर दोघे जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास (Accident in Lonavala) झाला.

    मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर किमी 65 जवळ हा अपघात झाला. यातील आयशर टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने लेनवर अचानक आडवा झाला. त्याचवेळी मागून येणारी कार (एमएच 02 एफजे 6697) ही या टेम्पोला मधोमध जोरात धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, यात मुंबई येथील रहिवासी असलेले श्रीकांत मुरलीधर सावंत (वय 48) व जनार्दन वामन सावंत (वय 61) हे जागीच ठार झाले. तर अश्विनी राणे व आर्य श्रीकांत सावंत (वय 20) हे दोघे जखमी झाले आहेत. यातील जखमींना उपचारासाठी सोमाटणे येथील पवना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

    पुण्यात घडताहेत अनेक गुन्हे

    गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात विविध गुन्हे घडत आहेत. यामध्ये खून, बलात्कार, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यानंतर आता मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे.