
दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेला ट्रक संतप्त ग्रामस्थांनी पेटवून दिल्याची (Accident News) घटना घडली. ऐन दसऱ्याच्या दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर गलांडवाडी नं. १ गावच्या हद्दीत घडली.
इंदापूर : दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेला ट्रक संतप्त ग्रामस्थांनी पेटवून दिल्याची (Accident News) घटना घडली. ऐन दसऱ्याच्या दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर गलांडवाडी नं. १ गावच्या हद्दीत घडली. याप्रकरणी अपघातास व मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा (Indapur Police) दाखल झाला आहे.
दशरथ मारुती चोरमले (वय ५५ वर्षे, रा. काळखेवस्ती, गलांडवाडी नं. १, ता. इंदापूर) असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचे पुतणे रोहिदास बाळु चोरमले (रा. काळखेवस्ती,गलांडवाडी नं.१) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. दशरथ मारुती चोरमले हे दूध विक्री करुन आपल्या हिरो होंडा दुचाकीवरुन (एमआय १४२ सी ५६०४) पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्याने इंदापूरातून आपल्या गावी निघाले होते.
त्यावेळी गलांडवाडी नं. १ गावच्या हद्दीतील हॉटेल मातोश्रीच्या समोर दुचाकीच्या पाठीमागून भरधाव वेगाने पुण्याकडे चाललेल्या ट्रक (क्र.एमएच ३२ ए जे.९२७३) च्या चालकाने दुचाकीस धडक दिली. त्यामुळे झालेल्या गंभीर अपघातात दशरथ चोरमले हे जागीच ठार झाले. या अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक तेथेच सोडून आरोपी पळून गेला.