सज्जनगडच्या घाटात तवेरा गाडी कोसळून भीषण अपघात; चालक जागीच ठार

साताऱ्यातील सज्जनगड (Accident in Sajjangad) येथे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास साताऱ्याहून सज्जनगडकडे निघालेल्या तवेराचा सज्जनगडचा घाट चढत असताना तीव्र वळणावर अपघात झाला. या अपघातात तवेरा गाडी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून गाडी 800 फूट खोल दरीत कोसळली.

    सातारा : साताऱ्यातील सज्जनगड (Accident in Sajjangad) येथे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास साताऱ्याहून सज्जनगडकडे निघालेल्या तवेराचा सज्जनगडचा घाट चढत असताना तीव्र वळणावर अपघात झाला. या अपघातात तवेरा गाडी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून गाडी 800 फूट खोल दरीत कोसळली.

    यामध्ये अजित शिंगरे (रा. सज्जनगड) हे जागीच ठार झाले. रात्री उशिरा या अपघाताचा आवाज स्थानिक नागरिकांना आल्यानंतर नागरिकांनी दरीच्या दिशेने धाव घेतली असता संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आले. सातारा तालुका पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर संबंधित व्यक्तीचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने आज सकाळी बाहेर काढण्यात आला.

    दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.