समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; अख्ख कुटुंबच संपलं, तीनजण जागीच ठार तर…

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

कारने ट्रकला पाठीमागून धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पती-पत्नी आणि मुलगा जागीच ठार झाला आहे. अनिल राठोड आणि भाग्यश्री राठोड असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे. तर त्यांच्या मुलाचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक अपघात घडले असून, अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर लासुर स्टेशन येथे हडस पिंपळगावजवळ शिर्डीहून नागपूरकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारने समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिली. यामध्ये पती-पत्नी आणि एक लहान मुलगा जागीच ठार झाला तर दोन मुले जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

जखमींना रुग्णालयात दाखल 

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनिल राठोड आणि भाग्यश्री राठोड असे या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. तर त्यांच्या मुलाचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये अख्ख कुटुंबचं संपल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.