समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; खाजगी ट्रॅव्हलचा टायर फुटला अन्…

शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर (Shirdi-Nagpur Samruddhi Highway) कारंजा शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या वाढोणाजवळ भीषण अपघात (Accident on Samruddhi Highway) झाला. नागपूरकडून मुंबईकडे जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स उलटल्याची घटना घडली. या भीषण अपघात 14 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती दिली जात आहे.

वाशिम : शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर (Shirdi-Nagpur Samruddhi Highway) कारंजा शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या वाढोणाजवळ भीषण अपघात (Accident on Samruddhi Highway) झाला. नागपूरकडून मुंबईकडे जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स उलटल्याची घटना घडली. या भीषण अपघात 14 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती दिली जात आहे.

वाशिम जिल्ह्यातील दोनदनजीक हा अपघात झाला. मुंबईला जाणाऱ्या मेहरा ट्रॅव्हल्सच्या बसचा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या या बसचा मागील टायर फुटला. यामुळे बस पलटी होऊन अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या ट्रॅव्हल्समधून प्रवास करणारे सुमारे 14 प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग नियंत्रण कक्षाच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका तिथे दाखल झाली. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि जखमींना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

चौघांची प्रकृती गंभीर

या अपघातात बसमधील 30 पैकी 14 प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ जखमींना बाहेर काढण्यात आले. यापैकी चार प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. अपघातातील जखमींना कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, गंभीर जखमी प्रवाशांना अकोला येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीही अपघात

समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर प्रवाशांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या महामार्गावरून शेकडो वाहन ये-जा करतात. त्यात काही दिवसांपूर्वी देखील अपघात झाला. त्यानंतर आज खाजगी ट्रॅव्हल्स पलटी होऊन अपघात झाला.