माढा कोर्टाकडे निघालेल्या वकिलाचा अपघाती मृत्यू

माढा कोर्टात कोर्टकामाकरीता निघालेल्या वकीलाचा कुर्डुवाडी - माढा रस्त्यावर भोसरे हद्दीत दोन दुचाकींच्या झालेल्या धडकेत मृत्यू झाला.

    कुर्डुवाडी : माढा कोर्टात कोर्टकामाकरीता निघालेल्या वकीलाचा कुर्डुवाडी – माढा रस्त्यावर भोसरे हद्दीत दोन दुचाकींच्या झालेल्या धडकेत मृत्यू झाला. अरुण परमेश्वर बोडरे वय ४१ रा.बादलेवाडी ता.माढा असे अपघातात मयत झालेल्या वकीलाचे नाव आहे. ही घटना सोमवार दि. १ रोजी दु. १२.३० वा दरम्यान घडली.

    याबाबत प्राथमिक माहिती अशी की ॲड. अरुण बोडरे हे त्यांची शाईन एम एच ४५ ए व्ही ८०१२ दुचाकीवरुन बादलेवाडी ता.माढा येथून कुर्डुवाडी मार्गे माढा कोर्टाकडे जात असताना कुर्डुवाडी – माढा रोडवर भोसरे हद्दीत बुलेट क्रमांक एम एच ४५ ए एस १७७७ या या दोन्ही गाड्यांमध्ये झालेल्या धडकेत शाईन गाडीवरील अरुण बोडरे वकील यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. घटनास्थळावर रस्त्याच्या बाजूला हेलमेट पडलेले होते.तर एका गाडीचा बंपर तुटलेला होता. मयत ॲड.बोडरे यांच्या पश्चात आई,वडिल,पत्नी,एक मुलगा, एक मुलगी , दोन भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती कोर्टातील सहकारी वकिलांना समजताच कुर्डुवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात वकीलांची मोठी गर्दी झाली होती.