महामार्ग ओलांडताना अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण ठार

महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत (Accident in CIDCO) एका अज्ञात ४५ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना अंबड पोलीस ठाणे हद्दीत इंदिरानगर बोगदाजवळ सुर्या सुप्रिया हॉटेलच्या समोरील महामार्गावर घडली.

    सिडको : महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत (Accident in CIDCO) एका अज्ञात ४५ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना अंबड पोलीस ठाणे हद्दीत इंदिरानगर बोगदाजवळ सुर्या सुप्रिया हॉटेलच्या समोरील महामार्गावर घडली.

    याबाबत सविस्तर वृत्त असे की, अंबड पोलीस ठाणे हद्दीत इंदिरानगर बोगदा जवळ सुर्या सुप्रिया हॉटेलच्या समोरील महामार्गावर अंदाजे ४५ वर्षे वयोगटातील पुरुषाला रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने उडवल्याने ती व्यक्ती जखमीरित्या झाली. त्याला रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    या अनोळखी पुरुषाची उंची ५ फुट २ इंच अंदाजे, चेहरा- उभट, अंगाने सडपातळ, रंगाने निमगोरा, डोळे काळे, नाक- सरळ, डोक्याचे केस काळे, दाढी- वाढलेली काळी व सफेद, कपडे अंगात निळया रंगाचा शर्ट, निळया रंगाची जिन्स पॅन्ट असे मयताचे वर्णन असून, कुणाला अशा व्यक्तीची माहिती असल्यास त्यांनी अंबड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.