Accused arrested for illegally slaughtering and selling 50 kg of beef

गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीस बंदी असताना देखील बेकायदेशीररीत्या कत्तल करून जनावरांचे मांस विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ आढळून आल्याने त्याच्या विरोधात उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    बाळापूर : तालुक्यातील निमकर्दा ते गायगाव मार्गावर गोवंश जातीच्या जनावरांचे मांस आणि वाहन, असा एकूण ६० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह एका आरोपीस उरळ पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी ५० किलो गोवंश मांस व मोटरसायकल असा ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    हातरुण येथील ५४ वर्षीय आरोपी शेख आजाद शेख युनूस गुरुवार, १९ रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास गोवंश मांसाची विक्री करण्यासाठी गायगाव येथे जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीस बंदी असताना देखील बेकायदेशीररीत्या कत्तल करून जनावरांचे मांस विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ आढळून आल्याने त्याच्या विरोधात उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंतराव वडतकार यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार विजयसिंह झाकर्डे, रघुनाथ नेमाडे यांनी कारवाई केली.