शिरपुरच्या अवैध सावकारी प्रकरणातील आरोपींना अटक; न्यायालयाने सुनावली एक दिवसाची पोलिस कस्टडी

शिरपुरच्या अवैध सावकारी प्रकरणातील 23 आरोपी सुमारे 1 महिन्यांपासून फरार होते. त्यापैकी फक्त 3 आरोपींना दि.18 जुलै रोजी शिरपुर शहर पोलिसांनी अटक केली होती. आज मंगळवारी दुपारी शिरपुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

    शिरपुर : शिरपुरच्या अवैध सावकारी प्रकरणातील 23 आरोपी सुमारे 1 महिन्यांपासून फरार होते. त्यापैकी फक्त 3 आरोपींना दि.18 जुलै रोजी शिरपुर शहर पोलिसांनी अटक केली होती. आज मंगळवारी दुपारी शिरपुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किरणकुमार बाऱ्हे यांनी न्यायालयांत सदर घडलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना तीन दिवसांकरिता पोलिस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती.

    तसेच आरोपींची कसून चौकशी करून, त्यांची साखळी उजेडात आणणे, झाडाझडती घेणे, आवश्यक दस्तऐवज व इतर वस्तू हस्तगत करणे अद्याप बाकी आहे. करिता पोलिस कस्टडीची मागणी केली. शिरपुर मॅजिस्ट्रेट कोर्टात आज दिनांक 19 जुलैला आरोपींना हजर केले होते. न्यायालयात सरकार पक्षातर्फे तपासी अधिकारी किरणकुमार बाऱ्हे आणि सहायक सरकारी अभियोक्ता ॲड. श्री. अवधूत भावसार यांनी बाजू मांडली आणि तीन दिवसांकरिता पोलिस कस्टडी मागितली. त्यावर  न्यायाधीश भद्रे यांनी आरोपींना आज एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली.

    सदरहू अवैध सावकारी प्रकरणातील 20 आरोपी अद्यापही फरारंच आहेत. सदरहू प्रकरणांत शिरपुरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी किरणकुमार बा-हे यांनी फरार आरोपींना अटकेसाठी विशेष पथक तयार केले असून, आरोपींना लवकरात लवकर अटकेसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले आहे.