तलवारी, गांजासह आरोपीला अटक; काेल्हापूरच्या जयसिंगपूर पाेलीसांची कारवाई

तलवारी व अमली पदार्थ विकणाऱ्या दिलदार कांबळे यास काेल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर पाेलीसांनी अटक केली आहे. कांबळे याच्याकडून सुमारे सहा तलावारी तसेच १५९० ग्रॅम गांजा सदृश अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत(Accused arrested with sword, marijuana; Action of Jaisingpur Paelis of Kalhapur).

    काेल्हापूर : तलवारी व अमली पदार्थ विकणाऱ्या दिलदार कांबळे यास काेल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर पाेलीसांनी अटक केली आहे. कांबळे याच्याकडून सुमारे सहा तलावारी तसेच १५९० ग्रॅम गांजा सदृश अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत(Accused arrested with sword, marijuana; Action of Jaisingpur Paelis of Kalhapur).

    दरम्यान काही दिवसांपासून महाराष्ट्रात तलावर विक्रीच्या प्रकरणात पाेलीस संशयित आराेपींना अटक करीत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात पाेलीस छापे टाकत आहे. जालना येथून देखील काही दिवसांपुर्वी माेठ्या प्रमाणात तलावारी जप्त करण्यात आल्या.

    महाराष्ट्रातील काेल्हापूर जिल्ह्यात तलावारी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पाेलीसांना मिळाली हाेती. त्यानूसार शिरोळ तालुक्यातील उमळवाड येथे मध्यरात्री पाेलीसांनी छापा टाकला.

    यामध्ये तलवारी विकणारा दिलदार कांबळे यास जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सहा धारधार तलवारींसह गांजा सदृश अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. कांबळे याच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.