sadichcha sane

आज 14 महिन्यांनी सदिच्छा सानेची हत्या (Murder) झाल्याचा खुलासा करण्यात आला आहे. आरोपी मिट्टू सिंहने सदिच्छाची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

    पालघर: सदिच्छा साने (Sadichcha Sane Case) ही पालघरमधील (Palghar) तरुणी 29नोव्हेंबर 2021 पासून बेपत्ता होती. आज 14 महिन्यांनी सदिच्छा सानेची हत्या (Murder) झाल्याचा खुलासा करण्यात आला आहे. आरोपी मिट्टू सिंहने सदिच्छाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. सदिच्छा 29 नोव्हेंबर 2021 रोजी परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली आणि पुन्हा घरी आलीच नाही. ती घरी आली नाही हे बघून तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी मिसिंग रिपोर्ट नोंदवत तिचा शोध सुरु केला. नंतर कुटुंबियांनी अपहरणाचा संशय व्यक्त केला. तेव्हा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यात आरोपी मिट्टू सिंह आणि त्याचा एक साथीदार होता. त्यांना पोलिसांनी अपहरणाच्या आरोपाखाली अटक केली होती. चौकशी दरम्यान तब्बल १४ महिन्यांनी आरोपी मिट्टू सिंहने खुनाची कबुली दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, 29 नोव्हेंबर 2021 च्या रात्री मृत सदिच्छा साने आणि आरोपी मिट्टू सिंहने बँड स्टँडला शेवटचा सेल्फी काढला होता. मुंबई गुन्हे शाखा कक्ष 9 च्या पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली होती. मात्र मुलगी गेली कुठे हे अजून त्यांना समजलेले नाही. पोलिसांनी दोघांना अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केले होते पण आता त्यात हत्येचे कलम जोडले जाणार आहे. आरोपीच्या कबुलीनंतर तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या का करण्यात आली याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी हत्येसाठी कलम 302 आणि पुरावे नष्ट करण्यासाठी 201 कलम जोडले आहे. मृतदेहाचा शोध अद्याप समुद्रात सुरु आहे.

    जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये सदिच्छा साने ही तिसऱ्या वर्षात शिकत होती. ती 29 नोव्हेंबर 2021 रोजी परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली. ती माघारी परतलीच नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार केली. सदिच्छा बेपत्ता होऊन 15 दिवस उलटल्यानंतरही जेव्हा तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा कुटुंबियांनी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला होता. सदिच्छाचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियासह बँड स्टॅन्ड बस स्थानकासह वांद्रे परिसरात अनेक ठिकाणी तिचे फोटो लावण्यात आले होते. पालघरमध्येही या प्रकरणी अनेक मोर्चे निघाले होते.