Accused father who molested his own daughter gets 3 years imprisonment

पत्नी बाहेर कामाला गेली असल्याने घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीने स्वतःच्या पोटच्याच मुलीचा विनयभंग मागील काही दिवसात केला होता. या प्रकरणी तळोधी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान आरोपीस अटक करून चंद्रपूर येथील कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

    वाढोणा : नागभीड तालुक्यातील (Nagbhid Taluka) तळोधी पोलीस स्टेशन (Talodhi Police Station) अंतर्गत येत असलेल्या सावरगाव येथील आरोपीस स्वतःच्या पोटच्या मुलीचा विनयभंग (Molestation) केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश (District Sessions Judge) अनुराग दीक्षित (Anurag Dixit) यांनी ३ वर्षाचा करावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवार २० जुलै रोजी ठोठावली आहे.

    पत्नी बाहेर कामाला गेली असल्याने घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीने स्वतःच्या पोटच्याच मुलीचा विनयभंग मागील काही दिवसात केला होता. या प्रकरणी तळोधी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान आरोपीस अटक करून चंद्रपूर येथील कारागृहात रवानगी करण्यात आली होती. या घटनेचा तपास महिला पोलीस निरीक्षक पूनम पाटील व पोलीस उपनिरीक्षक चंदा दंडवते यांनी पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

    न्यायालयाने संपूर्ण तपासणी दरम्यान योग्य पुराव्याच्या आधारे बुधवारी २० जुलै रोजी कलम ३५२ (अ) १ आय भांदवी सह कलम ८ पोक्सो कायद्याअंतर्गत ३ वर्षाच्या करावासाची व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. फिर्यादीच्या बाजूने सरकारी वकील स्वाती देशपांडे यांनी काम पाहिले. व कोर्ट पैरवी नायब पोलीस अधिकारी विजय वाकडे यांनी सहकार्य केले. हा महत्त्वपूर्ण निकाल न्यायाधीश अनुराग दीक्षित यांनी सुनावला.