Accused in Chakatirth double murder case in police net, husband and wife killed with sharp weapons

चाकातीर्थ येथे विश्वनाथबाबाचे समाधीस्थळ आणि हनुमान मंदिर व राजा बाबाचे समाधी स्थळ आहे. मंदिराची देखभाल डोंगरकिन्ही येथील गजानन निंबाळकर देशमुख (वय ६० वर्ष) ,निर्मला गजानन निंबाळकर देशमुख हे दाम्पत्य गत वीस वर्षांपासून करीत होते. सेवा देणाऱ्या निंबाळकर दाम्पत्याची १९ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री त्यांच्या राहत्या खोलीत अज्ञात हल्लेखोराने धारधार शस्त्राने हत्या केली होती.

    जऊळका रेल्वे वा. : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चाकातीर्थ (Chakatirtha) येथे १९ सप्टेंबर २०२१ ला पती पत्नीची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या दुहेरी हत्याकांडात (Double homicide) दोन आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली होती. तर, तिसरा आरोपी फरार होता. तब्बल दहा महिन्यानंतर फरार आरोपीला डव्हा येथून पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

    डव्हा तीर्थक्षेत्रापासून जवळच असलेल्या चाकातीर्थ येथे विश्वनाथबाबाचे समाधीस्थळ आणि हनुमान मंदिर व राजा बाबाचे समाधी स्थळ आहे. मंदिराची देखभाल डोंगरकिन्ही येथील गजानन निंबाळकर देशमुख (वय ६० वर्ष) ,निर्मला गजानन निंबाळकर देशमुख हे दाम्पत्य गत वीस वर्षांपासून करीत होते. सेवा देणाऱ्या निंबाळकर दाम्पत्याची १९ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री त्यांच्या राहत्या खोलीत अज्ञात हल्लेखोराने धारधार शस्त्राने हत्या केली होती. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करून सदर हत्याकांडात अजुनही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने तपास करण्यात आता असता, या प्रकरणातील मुख्य आरोपी सुनील जयराम खरात, (वय ३५ वर्षे, रा.डव्हा, ता. मालेगाव ) हा हत्याकांडापासून फरार असल्याची माहिती समोर आली.

    सदर आरोपी आपली ओळख लपवून राहत होता. वाशीम जिल्हा पोलीस (Washim District Police) दलामार्फत त्यास शोधण्याचे अथक प्रयत्न करूनही तो मिळून येत नव्हता. अशातच १८ जुलै रोजी गुप्त बातमीदाराकडून प्राप्त माहितीच्या आधारे मुख्य आरोपीस डव्हा शेतशिवारातून जऊळका पोलीस स्टेशनच्या (Jaulka Police Station) तपास पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह,अपर पोलीस अधीक्षक  गोरख भामरे,उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जऊळका रेल्वे पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे, पोउपनि पाटील, पोउपनि गोरे, नापोकॉ. काळदाते, चानापोकॉ. काटेकर, पोकॉ.  कावरखे, पोकॉ. भूरकाडे यांनी केली.