ट्रक चालकाच्या खून प्रकरणी आरोपी जेरबंद ; शिरवळ पोलिसांची दमदार कामगिरी

शिंदेवाडी तालुका खंडाळा येथील पेट्रोल पंपाच्या परिसरात दोन कंटेनर चालकांमध्ये पत्नीच्या चारित्र्याविषयी बोलण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात शिवानंद पुजारी याने स्वप्निल गीते यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले होते.

    सातारा : शिंदेवाडी तालुका खंडाळा येथील पेट्रोल पंपाच्या परिसरात दोन कंटेनर चालकांमध्ये पत्नीच्या चारित्र्याविषयी बोलण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात शिवानंद पुजारी याने स्वप्निल गीते यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले होते. यामध्ये गीतेचा जागीच मृत्यू झाला शिवानंद जगन्नाथ पुजारी मित्र याला शिरवळ पोलिसांनी बारा तासात जेर बंद केले या घटनेची फिर्याद बींग लिंगेश्वर बालाजी हालसे यांनी दिली असून अधिक तपास शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने करत आहेत.

    या प्रकरणाचे अधिक माहिती अशी दि. २० नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता शिंदेवाडी येथील पेट्रोल पंपाच्या मोकळ्या जागेत दोन कंटेनर चालकांमध्ये पत्नीच्या चारित्र्याविषयी घाणेरड्या भाषेत बोलण्याच्या कानावरून जोरात वाद झाला. कंटेनर चालक स्वप्निल गीते शिवानंद जगन्नाथ पुजारी राहुल काशीद ट्रक चालक लक्ष्मण उर्फ सोमनाथ अभिमान देशमुख व बीर लिंगेश्वर हालसे हे रात्रीचे जेवण बनवत असताना गीते देशमुख व पुजारी हे दारू पीत बसले होते. त्यावेळी गीते अचानक देशमुख यांच्या पत्नीच्या चारित्र्यावरून घाणेरड्या भाषेत बोलू लागला तेव्हा दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. गीतेने देशमुख याला दगड डोक्यात मारला. देशमुख हे जखमी झाल्याने काशीद व हालसे हे भांडणे सोडू लागले त्यामुळे गीते हा काशीद व हालसे यांना शिवीगाळ करत दगड फेकून मारू लागला तसेच त्याने शिवानंद पुजारी यालाही शिवीगाळ करीत मारहाण केली.