bharti singh and harsh limbachiya

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने(एनसीबी) (NCB) नुकतेच या प्रकरणी २०० पानांचे आरोपपत्र दाखल आहे. त्या आरोपपत्रातील आरोपी सोमिया नारायणन (२३) हा माफीचा साक्षीदार झाला असून त्याने त्याबाबत साक्ष न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवली आहे.

    मुंबई: कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiya)  यांच्या विरोधातील २०२० मधील अंमली पदार्थ प्रकरणातील (Drugs Case) एका आरोपीला माफीचा साक्षीदार म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता तो फिर्यादी पक्षाकडून साक्ष देईल.

    अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने(एनसीबी) नुकतेच या प्रकरणी २०० पानांचे आरोपपत्र दाखल आहे. त्या आरोपपत्रातील आरोपी सोमिया नारायणन (२३) हा माफीचा साक्षीदार झाला असून त्याने त्याबाबत साक्ष न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवली आहे. आपला मित्र तुषार शेट्टी याच्या सांगण्यावरून त्याच्या मित्रासाठी गांजा विकत आणला होता. परंतु, आपण शेट्टीच्या मित्राला ओळखत नसल्याचे सौमियानारायणने सांगितले. अंधेरी टेलिफोन एक्सचेंजजवळ जाऊन पॅकेट मास्क आणि हेल्मेट घालून दुचाकीवर आलेल्या एका व्यक्तीला दिले आणि ड्रग्ज देणाऱ्या पेडरला देण्यासाठी एटीएममधून पैसे काढल्याचेही सौमियानारायणने सांगितले.

    काय आहे प्रकरण?
    एनसीबीनं २१ नोव्हेंबर २०२० रोजी कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष यांच्या प्रॉडक्शन-हाऊसच्या ऑफिसवर छापा टाकला होता. या छाप्यात ८६.५ ग्रॅम गांजा एनसीबीनं जप्त केला होता. त्यानंतर या जोडप्याला अटक करण्यात आली. त्यानंतर दोघांनाही न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं, त्यावेळी न्यायालयाने त्यांना ४ डिसेंबर २०२० पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, या जोडप्याला २३ नोव्हेंबर २०२० रोजी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयानं प्रत्येकी १५ हजार रुपयांची जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.