Accused of molesting and threatening a minor girl sentenced to 3 years imprisonment

सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने पीडिता, पीडितेच्या बहिणीची साक्ष ग्राह्य धरून आरोपीस भादंविचे कलम ३५४ अ अंतर्गत तीन वर्षे कारावास, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्याची कारावासाची शिक्षा ठोठावली.

    यवतमाळ : अल्पवयीन मुलीचा( Minor girl) विनयभंग (Molestition) केल्याचा दोष सिद्ध झाल्याने आरोपीला तीन वर्षे कारावासाची (Three years imprisonment) शिक्षा सुनावण्यात आली. येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश (Additional Sessions Judge) तथा विशेष न्यायाधीश एस. डब्लु चव्हाण (Special Judge S. W. Chavan) यांनी गुरुवारी २३ जून रोजी या प्रकरणाचा निर्वाळा दिला. मंगेश रेणू राव पखाले (३४) (रा. बेलोरा, ता. यवतमाळ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

    आरोपी ३० जून रोजी सायंकाळी पाच वाजता पीडितेच्या घरी आला. पीडिता पलंगावरील चादर झटकत असताना मंगेश बाहेर चल, असे म्हणत होता व तिचा वाईट उद्देशाने हात पकडला. घराचे मागे गोदरीत चल असे म्हणत, ही गोष्ट तुझ्या आईला सांगू नको, सांगितल्यास पाहून घेईल, अशी धमकी दिली. सदर घटनेची तक्रार प्राप्त होताच यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी (Yavatmal Rural Police) गुन्हा नोंद केला.

    साहाय्यक पोलीस निरीक्षक (Assistant Inspector of Police) गजानन करेवाड (Gajanan Karewad) यांनी तपास पूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने पीडिता, पीडितेच्या बहिणीची साक्ष ग्राह्य धरून आरोपीस भादंविचे कलम ३५४ अ (Section 354A of Bhadanvi) अंतर्गत तीन वर्षे कारावास, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्याची साधी कारावासाची शिक्षा ठोठावली.

    तसेच भादविचे कलम ४५२ अंतर्गत तीन वर्षे कारावासाची शिक्षा तसेच एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास, पोक्सोचे कलम ८ अंतर्गत ३ वर्षे कारावासाची शिक्षा तसेच एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर शिक्षा ही आरोपीला एकत्रितपणे भोगावी लागेल. सरकारी पक्षाच्या वतीने साहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. संदीप अ. दर्डा यांनी काम पाहिले. त्यांना विलास बातारकर यांचे सहकार्य लाभले.