पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्टवर ‘छम-छम’; 10 ते 12 बालांसह 48 जणांवर कारवाई

पाचगणी खिंगर येथील पाचगणी टेन्ट हाऊसवर बारबाला नाचवल्याप्रकरणी दहा ते बारा बालांसह सोलापूर जिल्ह्यातील २४ खते औषधे बी बियाणे विक्रेत्या डिलर असे एकूण ३५ ते ते ३६ जणांवर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलिस अधीक्षक आचल दलाल यांनी या पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्टवर छापा टाकून कारवाई केली.

    कुडाळ : पाचगणी खिंगर येथील पाचगणी टेन्ट हाऊसवर बारबाला नाचवल्याप्रकरणी दहा ते बारा बालांसह सोलापूर जिल्ह्यातील २४ खते औषधे बी बियाणे विक्रेत्या डिलर असे एकूण ३५ ते ते ३६ जणांवर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलिस अधीक्षक आचल दलाल यांनी या पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्टवर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईने सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. यामध्ये पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्टचा मालक डॉक्टर विजय दिघे आंबेघर तालुका जावळी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    रविवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्टचे मालक डॉक्टर विजय दिघे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दोन महिन्यांपूर्वी देखील पाचगणी येथीलच कासवंड येथे स्प्रिंग व्हॅली या रिसॉर्टवर देखील अशाच पद्धतीच्या बारबाला नाचवल्या गेल्या होत्या. यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पाच डॉक्टरांवर कारवाई करण्यात आले होते. त्यानंतर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची पाचगणी येथील पाचगणी टेन्ट हाऊस या रिसॉर्टवर मोठे कारवाई मानली जात आहे.

    रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अतिरिक्त पोलिस अधीक्षक आचल दलाल यांना आपल्या खास खबऱ्यामार्फत माहिती मिळताच त्यांनी टीम पाचगणीच्या दिशेने रवाना केली. पाचगणी रिसॉर्टवर सुरू असणाऱ्या छमछमवर सातारा पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये रिसॉर्टच्या आत असणाऱ्या बारा बारबाला व सोलापूर जिल्ह्यातील कृषी खत विक्री व्यावसायिक असे एकूण ३६ जणांना पोलिसांनी चौकशी करून ताब्यात घेतले.