
अजित पवार गटाने पक्षावर जो दावा केलाय, तो चुकीचा आहे, असं म्हणत शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. यानंतर अजित पवार गट आक्रमक होताना दिसत आहे.
मुंबई : २ जुलै २०२३ रोजी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP Congress) मोठे बंड करत, सरकारसोबत सहभागी झाले. यावेळी त्यांच्यासोबत ३० पेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा त्यांनी केला. यानंतर पक्ष आणि चिन्हावर दोन्ही गटाकडून दावा करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीत कोणतीच फूट नाहीय, पक्षातील काही लोकांनी वेगळा निर्णय घेतलाय, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणताहेत. त्यामुळं अजित पवार गटाने पक्षावर जो दावा केलाय, तो चुकीचा आहे, असं म्हणत शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. यानंतर अजित पवार गट आक्रमक होताना दिसत आहे. (action against five mla of sharad pawar group do you know who are the five mla ajit pawar said)
आमदारांच्या कारवाईसाठी शरद पवार गट आक्रमक…
दरम्यान, एकिकडे अजित पवारांनी बंड करत, सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद तसेच आठ मंत्रीपदं पटकावली आहेत. तर पक्ष व चिन्हावरुन दोन्ही गट आमनेसामने येत असताना, आता अजित पवार गटाच्या विधान परिषदेतीला पाच आमदारांवर कारवाई करण्यासाठी शरद पवार गटाने विधानस परिषदेच्या उपसभापतींकडे धाव घेतली आहे. त्यामुळे या आमदारांच्या पात्र-अपात्रतेवर लवकरच कार्यवाही सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं शिंदे गट व ठाकरे गट यांच्यासारखीच परिस्थिती दोन्ही पवार गटात होणार असल्याचं बोललं जातंय.
५ आमदार कोण माहितेय का?
सध्या अजित पवार गट व शरद पवार गटांमध्ये जोरदार पक्षावरुन रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान, आता अजित पवार गटांतील पाच आमदारांवर कारवाई व्हावी, यासाठी आक्रमक झाले आहेत. अजितदादा गटाचे विधान परिषदेतील आमदार सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, विक्रम काळे आणि अनिकेत तटकरे यांच्याविरोधात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तक्रार केली होती. तर विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्याविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी याचिका दाखल केली होती. या आमदारांनी बाजू मांडावी म्हणून त्यांना नीलम गोऱ्हे यांच्याकडून पुढील आठवड्यात त्यांना नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळं अजित पवार गटाच्या या पाच आमदारांवर उपसभापती कारवाई करणार का, हे पाहावे लागेल.