अलिबागमधील पाच रिसॉर्टवर कारवाईचा बडगा; सीआरझेडचे उल्लंघन

नागाव येथील सीआरझेड उल्लंघनाबाबत न्यायालयात दाखल तक्रारींची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी प्रशासनाकडे मागितली होती. सावंत यांना मिळालेल्या माहितीनुसार अलिबाग तालुक्यातील मौजे नागाव येथील ग.नं.२४३९ मध्ये सीआरझेडचे कायदयाचे उल्लंघन करून ‘नाखवा बीच रिसॉर्ट’ बांधल्यामुळे दिनेश पांडूरंग नाखवा आणि शैलेश पांडूरंग नाखवा यांच्या विरूध्द उपविभागीय अधिकारी अलिबाग प्रशांत ढगे यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.

    अलिबाग : नागाव समुद्र किनारी (Nagaon Beach) सीआरझेडचे उल्लंघन (Violation Of CRZ) करणे रिसॉर्ट मालकांना (Action On Resort Owner) चांगलेच महागात पडले आहे. अनधिकृत बांधकाम (Illegal Construction) केल्याप्रकरणी अलिबागचे प्रांताधिकारी (District Magistrate) प्रशांत ढगे यांनी कारवाईचा बडगा उगारत थेट न्यायालयातच तक्रार (Complaint To Court) दाखल केली आहे. त्यामुळे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. दुसरीकडे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर जसा कायद्याचा बडगा उगारला आहे. त्याचप्रमाणे सीआरझेडचे उल्लंघन करुन टोलेजंग इमारती बांधणाऱ्या बड्या उद्योजकांवरही प्रशासनाने जरब बसवावी अशी मागणी स्थानिक व्यावसायिकांकडून होत आहे.

    अलिबाग (Alibaug) हे पर्यटन दृष्ट्या झपाट्याने विकसीत होत आहे. या ठिकाणी पर्यटन व्यवसायाला चांगल्याच संधी उपलब्ध झाल्या आहेत. स्थानिकांसह काही बाहेरील व्यावसायिकांनी या ठिकाणी लॉज, कॉटेज, रिसॉर्ट, रेस्टॉरंट असे व्यवसाय उभे केले आहेत. व्यवसाय उभे करताना काहींनी नियम पायदळी तुडवले आहेत, तर काहींनी यासाठी लागणाऱ्या आवश्यकत्या परवानग्याच घेतलेल्या नसल्याचे समोर आले आहे.

    नागाव येथील सीआरझेड उल्लंघनाबाबत न्यायालयात दाखल तक्रारींची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी प्रशासनाकडे मागितली होती. सावंत यांना मिळालेल्या माहितीनुसार अलिबाग तालुक्यातील मौजे नागाव येथील ग.नं.२४३९ मध्ये सीआरझेडचे कायदयाचे उल्लंघन करून ‘नाखवा बीच रिसॉर्ट’ बांधल्यामुळे दिनेश पांडूरंग नाखवा आणि शैलेश पांडूरंग नाखवा यांच्या विरूध्द उपविभागीय अधिकारी अलिबाग प्रशांत ढगे यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. प्रस्तुत प्रकरणात रिसॉर्ट बांधताना सरकीरची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. संबधीत ग्रामपंचायतीने फक्त घर बांधण्यासाठी परवानगी दिलेली असताना त्याठिकाणी अनधिकृतपणे रिसॉर्ट सुरू केले आहे. प्राप्त तक्रारींवर नगर रचना कार्यालयाने ही मिळकत रायगड प्रादेशिक योजनेतील उसर परिसर विकास केंद्रामध्ये बागायत विभागामध्ये येते. त्याचप्रमाणे सदरची मिळकत सीआरझेड ३ मध्ये २०० मीटर ते ५०० मीटर अंतरामध्ये येत असल्याने सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

    नागाव येथील अशोक प्रभाकर मस्तकार, शमा हेमंत अनाथे, स्वप्नील प्रवीण तरे यांचे आरसीसी कॉटेज आणि स्विमींग पूल, रमेश गोपाळ सुतार, सोनाली आशिष बामणोलकर यांचे आरसीसी कॉटेज, उत्तम लक्ष्मण राउळ, सपना उत्तम राउळ यांचे आरसीसी कॉटेज, स्विमींग पूल, महेश धनाजी गोगरी यांचे रेस्टॉरंट, स्वीमींग पूल, किचन, गाळे, टॉयलेट सीआरझेडचे उल्लंघन करून बांधल्याप्रकरणी त्यांच्या विरूध्दही अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    नागाव येथील समुद्रकिनारी सीआरझेड कायदयाचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी आलेल्या तक्रारी व अहवालानुसार, बांधकाम करणा-यांना नोटिसा बजावून त्यांची चौकशी सुरू केली आहे. तसेच न्यायालयात भारतीय पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 19 अन्वये तक्रार दाखल केली आहे, असे अलिबागचे प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी सांगितले.