action against illegal constructions in h ward of kdmc continues mrtp case has already been filed nrvb

या ठिकाणी बांधकामधारकांनी महापालिकेची यंत्रसामुग्री व मनुष्यबळ पोहचू नये, याकरिता इमारतीच्याकडे जाण्याच्या रस्त्यात वाहने ऊभी करुन अडथळा निर्माण केला होता. तथापि संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल करुन पोलीस विभागामार्फत अडथळा दूर करण्याची कारवाई झाल्यानंतर तोडक कारवाई करण्यात आली.

    कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे (Commissioner Dr Bhausaheb Dangde) यांचे निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप (Deputy Commissioner Sudhakar Jagtap) यांच्या मार्गदर्शनाखाली ह प्रभागाचे सहा. आयुक्त सुहास गुप्ते यांनी डोंबिवली पश्चिम कुंभार खान पाडा, होली क्रॉस स्कूल समोरील बांधकामधारक मनोज म्हात्रे , मंदार म्हात्रे, मयूर म्हात्रे यांच्या तळ + ६ मजली इमारतीच्या बांधकामाचे स्लॅब पाडकाम कारवाई मंगळवारी दिवसभरात केली.

    सदर कारवाई करतेवेळी या ठिकाणी बांधकामधारकांनी महापालिकेची यंत्रसामुग्री व मनुष्यबळ पोहचू नये, याकरिता इमारतीच्याकडे जाण्याच्या रस्त्यात वाहने ऊभी करुन अडथळा निर्माण केला होता. तथापि संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल करुन पोलीस विभागामार्फत अडथळा दूर करण्याची कारवाई झाल्यानंतर तोडक कारवाई करण्यात आली.

    सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी, विष्णुनगर पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांच्या मदतीने आणि ४ काँक्रीट ब्रेकर व २० मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली. सदर बांधकामधारकांवर यापूर्वीच एम.आर.टी.पी.चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तरी नागरिकांना महानगरपालिकेमार्फत आवाहन करण्यात येते की, कल्याण डोंबिवली‍ परिसरात घरे घेताना महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात किंवा नगररचना विभागाकडे बांधकामाच्या अधिकृततेबाबत चौकशी करुन घरे विकत घ्यावीत.