महाराष्ट्र शासन पीआरसी कमिटी चेअरमन संजय रायमुलकर यांच्याशी नवराष्ट्राचे पत्रकार शेखर गोतसुर्वे यांनी संवाद साधला
महाराष्ट्र शासन पीआरसी कमिटी चेअरमन संजय रायमुलकर यांच्याशी नवराष्ट्राचे पत्रकार शेखर गोतसुर्वे यांनी संवाद साधला

शासन निधी अपहार करणारे दोषी अधिकारी आढळल्यास कारवाई निश्चीत करणार असल्याची माहीती पीआरसी कमिटी चेअरमन संजय रायमुलकर यांनी दैनिक 'नवराष्ट्र'शी बोलताना दिली.

    सोलापूर : शासन निधी अपहार करणारे दोषी अधिकारी आढळल्यास कारवाई निश्चीत करणार असल्याची माहीती पीआरसी कमिटी चेअरमन संजय रायमुलकर यांनी दैनिक ‘नवराष्ट्र’शी बोलताना दिली.
    पीआरसी कमिटी मंगळवारी सायंकाळी सोलापूरात दाखल झाली . जिल्हा परिषदेच्या कारभाराची तपासणी आणि साक्ष घेण्याची प्रक्रीया बुधवार आणि गुरुवार रोजी पार पडणार आहे.
    माळशिरस आमदार राम सातपुते यांनी चेअरमन संजय रायमुलकर यांच्या पुढे समाजकल्याणच्या भ्रष्टकारभाराची कैफीयत मांडली आहे. दलितवस्तीला ज्यादा निधी देण्यासाठी ५% लाच घेतले जात असल्याचे सांगितले आहे. समाजकल्याण अधिकारी चंचल पाटील आणि लिपीक नरळे यांना शासकीय सेवेतून निलंबीत करा आशी मागणी आ.सातपुते यांनी केेल्याचे चेअरमन रायमुलकर यांनी सांगितले. दरम्यान या पाशर्वभुमीवर चेअरमन रायमुलकर म्हणाले दलितवस्तीचा निधी गावनिहाय लोकसंख्या प्रमाणे वाटप करण्यात आला आहे का ? हे प्रथम तपासले जाईल यामध्ये दोषसिध्द झाल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. जिल्हयातील अनेक आमदारांचे फोन आले आहेत. अनेकांनी तक्रारी कळवल्या आहेत. जिल्हा परिषद सदस्य आणि सामाजीक संघटनेचे निवेदन स्वीकारणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पंचायात समितीना भेटी देणार आहे. गावनिहाय जिल्हा परिषदेनी केलेल्या कामांची पाहणी करणार असल्याचे चेअरमन संजय रायमुलकर म्हणाले.