कल्याण गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचा मोबाईल चोरणारे दोन सराई चोरटे गजाआड

कल्याण आणि कसारा रेल्वे स्टेशन दरम्यान काही दिवसापूर्वी लोकलमध्ये प्रवास करताना दोन प्रवासांचे मोबाईल चोरीला गेलो होते.

    कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई : गर्दीचा फायदा घेत लोकल ट्रेनमध्ये प्रवासांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. गौतम सिंह आणि समीर खान असे या दोन चोरट्याचे नाव असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

    कल्याण आणि कसारा रेल्वे स्टेशन दरम्यान काही दिवसापूर्वी लोकलमध्ये प्रवास करताना दोन प्रवासांचे मोबाईल चोरीला गेलो होते. या दोन्ही प्रवाशांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी प्रमोद देशमुख यांच्या पथकाने हा तपास सुरू केला. अखेर या प्रकरणात पोलिसांना यश आले आहे. दोन मोबाईल चोरट्यांना अटक केली आहे. हे दोघे गर्दीच्या फायदा घेत लोकल ट्रेनमध्ये प्रवास करायचे आणि प्रवाशांचे मोबाईल चोरून पसार व्हायचे.

    गौतम सिंह आणि समीर खान असे या दोन चोरट्याचे नाव आहे. यांच्यावर याआधी देखील अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. आणखी काही गुन्हे यांच्याकडून उघडकीस होण्याची शक्यता आहे. सध्या यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल झाली असल्याची माहिती समोर आली आहे