शिरगाव परिसरातील दारू भट्ट्यांवर कारवाई; पोलिसांकडून तब्बल आठ लाखांचा मुद्देमाल नष्ट

शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर शिरगाव पोलीस आणि खंडणी विरोधी पथकाने दोन ठिकाणी सुरु असलेल्या दारू भट्ट्यांवर छापे मारून कारवाई केली. यामध्ये आठ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

    पिंपरी : शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर शिरगाव पोलीस आणि खंडणी विरोधी पथकाने दोन ठिकाणी सुरु असलेल्या दारू भट्ट्यांवर छापे मारून कारवाई केली. यामध्ये आठ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

    पहिली कारवाई शिरगाव पोलिसांनी केली. पवना नदीच्या काठावर शिरगाव येथे एका व्यक्तीने दारू भट्टी लावली असल्याची माहिती शिरगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी (दि. 29) सायंकाळी पाच वाजता शिरगाव पोलिसांनी कारवाईमध्ये दोन लाख 41 हजार रुपये किमतीचे तीन हजार गुळ मिश्रित रसायन नष्ट केले. या प्रकरणात कुंदन प्रकाश नानावत (वय 52, रा. शिरगाव, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दुसरी कारवाई शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर कंजार भाट वस्तीजवळ करण्यात आली. खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापा मारून सात हजार लिटर गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे पाच लाख 60 हजारांचे गुळ मिश्रित रसायन नष्ट केले. याप्रकरणी जतीन जितेंद्र राजपूत (वय 27, रा. शिरगाव, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.