पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत फलकांवर कारवाई, फक्त 1 हजार 136 अधिकृत जाहिरात फलक

  पिंपरी : किवळे दुघर्टनेनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील १७४ अनधिकृत जाहिरात फलक जमीनदोस्त करण्यात आले आहेत. शहरात फक्त १ हजार १३६ जाहिरात फलक अधिकृत आहे. यापुढील काळात शहरात अनिधकृत फलक आढळल्यास फलक जमीनदोस्त केले जातील, असा इशारा महापालिकेने दिला  आहे.
  पाच वर्षांत दोन वेळा बाह्य जाहिरात धोरण
  महापालिकेच्या वतीने गेल्या पाच वर्षांत दोन वेळा बाह्य जाहिरात धोरण तयार करण्यात आले. त्यांची अंमलबजावणी करण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली. मात्र, 2022 मधील राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार नवे धोरण स्वीकारण्यात आले.
  तीन जण गंभीर जखमी
  महापालिकेचे पूर्वीचे धोरण रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, १७ एप्रिल २०२३ राेजी किवळे येथे अनधिकृत जाहिरात फलक कोसळून पाच मजुरांचा मृत्यूझाला. तर, तीन जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. नियमांची काटेकोर अंमलबजावणीकरण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शहरातील १७४ अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली.
  आउटडोअर असोसिएशनकडून दावा दाखल
  दरम्यान, महापालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात पिंपरी-चिंचवड आउटडोअर असोसिएशनने दावा दाखल केला होता. न्यायालयानेनियमानुसार असलेल्या जाहिरात फलकांना परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, त्या जाहिरात फलक व्यावसायिकांकडूनआवश्यक कागदपत्रांसह परवाना शुल्क भरून घेण्यात येत आहे.
  १ हजार १३६ पैकी ८६१ जणांचे नुतनीकरणासाठी अर्ज..
  शहरात सध्या १ हजार १३६ जाहिरात फलक अधिकृत आहेत. यापैकी ८६१ जणांनी नुतनीकरणासाठी अर्ज केले आहेत. नूतनीकरणासाठी सादर करण्यात आलेल्या अर्जाची तपासणी केली जाणार आहे.  अर्जात जाहिरात फलकाचा आकार ४० फूट बाय २०फूट आहे. मात्र, प्रत्यक्षात फलक , नियमानुसार फलकावर नंबरची पाटी, क्यूआर कोड नसल्यास, लोखंडी फलक जमिनीखाली व वरगंजलेले किंवा सडलेले असल्यास त्या फलकाला परवानगी न देता त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
  —-
  शहरातील सर्व जाहिरात फलक एकसमान असावेत.  यासाठी महापालिकेचा प्रयत्न असणार आहे. सध्या शहरात १ हजार १३६अधिकृत जाहिरात फलक आहेत. किवळे दुघर्टनेनंतर १७४ अनधिकृत जाहिरात फलक काढून घेतले आहेत.
  सुभाष इंगळे,
  उपायुक्त,
  आकाश चिन्ह व परवाना विभाग.