लोणावळ्यात परिसरातील अडथळा ठरणाऱ्या 63 जणांवर कारवाई; ५० हजाराचा दंड वसूल

पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांची कारवाई 

    वडगाव मावळ : पोलीस प्रशासन गेल्या काही दिवसांपासून अँक्शन मोडवर असून नियम न पाळणारे टपरी व हातगाडी धारक, रहदारीला अडथळा ठरतील अशी वाहने उभी करणारे वाहन चालक, रस्त्यावर दुकानांच्या पाट्या लावणारे व्यवसायिकांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी लोणावळा बाजार भाग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर प्रादेशिक परिवहन विभाग, लोणावळा नगरपरिषद, लोणावळा शहर पोलीस यांनी संयुक्त कारवाई रित्या 63 जणांवर कारवाई करत सुमारे 50 हजार रूपये दंड वसूल केला.
    लोणावळा शहरामध्ये प्रादेशिक परीवहन विभाग लोणावळा नगरपरिषद लोणावळा व लोणावळा शहर पोलीस ठाणे यांनी संमातरपणे लोणावळा शहरातील जुना पुणे ते मुंबई महामार्ग क. 4 वर महामार्गाच्या दुर्तफा लावण्यात येणारे वाहनावर कारवाई करण्यात आली. तसेच फुड ट्रक अन्वये एका वाहनामध्ये खाद्य पदार्थाची विक्री करणारे चालकावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच महामार्गाच्या कडेला लावण्यात येणाऱ्या फळे व खादय पदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच नो पार्किंगमध्ये वाहने पार्क करणारे चालकांवर एकूण 32 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
    सदरची कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग लोणावळा सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली  सीताराम डुबल, लतिफ मुजावर पोलीस उप निरीक्षक, वाहतूक विभागाचे पो. हवालदार शकिल शेख, अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक सचिन कडाळे यांनी केली

    भविष्यात लोणावळा शहरामध्ये अनधिकृत फळ विक्रेते, अन्न पदार्थ विक्रेते महामार्गाच्याकडेला चार चाकी वाहने पार्क करुन निघून जाणे तसेच अनधिकृत साईन बोर्ड लावणे यांच्यावर प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे.

    -सत्यसाई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग