
तपासणी दरम्यान त्यांना दोन डस्टबिनमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्याबाबत सख्त सूचना देण्यात आल्या. २ आस्थापनांमध्ये ७५ टक्के मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचा वापर करत असल्याचे आढळून आल्याने त्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे १० हजारांचा दंड वसूल (10 thousand fine recovered) करण्यात आला.
अमरावती : महापालिकेच्या ( Mahapalika ) वतीने दोन प्लास्टिक बंदी (Plastic ban) व डस्टबिन वापराबाबत दोन आस्थापनांवर कारवाई करत त्यांच्याकडून १० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. आयुक्त व वैद्यकीय अधिकारी (Commissioner and Medical Officer) (स्वच्छता) तथा उपायुक्त (सा.) डॉ. सीमा नैताम (Deputy Commissioner (Sa.) Dr. Sima Naitam ) यांच्या आदेशानुसार व सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक २ यांच्या निर्देशानुसार मंगळवारी राजापेठ अंतर्गत येणाऱ्या जवाहर रोड, प्रभात चौक, परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन बाबत मोहिम राबविण्यात आली.
आस्थापना धारक, किरकोळ विक्रेता, हॉकर्स, फळ विक्रेता, फूल विक्रेता यांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान त्यांना दोन डस्टबिनमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्याबाबत सख्त सूचना देण्यात आल्या. २ आस्थापनांमध्ये ७५ टक्के मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचा वापर करत असल्याचे आढळून आल्याने त्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे १० हजारांचा दंड वसूल (10 thousand fine recovered) करण्यात आला. सदर मोहीमेमध्ये जेष्ठ स्वास्थ निरीक्षक विजय बुरे, स्वास्थ निरीक्षक प्रशांत गावनेर, महेश पळसकर, अनिकेत फुके, योगेश कंडारे, वैभव खरड उपस्थित होते.