कल्याण येथे वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा

शुक्रवारी ड्रंक अँड ड्राईव्ह मधील सहा मद्यपी वाहन चालकांना न्यायालयात हजर केले. त्यापैकी चार मद्यपी वाहन चालकांना प्रत्येकी दहा हजार रुपये दंड व त्यांचे वाहन चालवण्याचे लायसन्स सहा महिन्यांकरिता निलंबित करण्यात आले व दोन मद्यपी वाहन चालकांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये दंड असा एकूण ७० हजार रुपये दंड व चार वाहन चालकांचे लायसन्स सहा महिन्यांकरिता निलंबित करण्यात आले

  कल्याण : कल्याण (Kalyan) येथे शहर वाहतूक उपशाखा कल्याण (Traffic Sub Division Kalyan) यांनी कारवाईचा बडगा उगारत वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकाकडून तब्बल ४ लाख १ हजार ३५० रू दंडात्मक कारवाई केली. बुधवारी शहर वाहतूक उपशाखा कल्याण यांच्या वतीने स्पेशल ड्राईव्ह (Special Drive) राबवून तसेच ऑल आऊट ऑपरेशन राबवित कल्याण हद्दीत वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या दोषी आढळलेल्या बेशिस्त वाहन चालकांनी हेल्मेट, न वापरणे, सीट बेल्ट, नलावणे तसेच ऑटो रिक्षाचालकाने फ्रंट शीट घेणे अंतर्गत केलेल्या मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाईचा बडगा उगरण्यात आला.

  या कारवाईत

  प्रकार

  कारवाई केलेल्यांची संख्या

  ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह
  विना हेल्मेट ६६
  विना सीट बेल्ट २७
  ऑटोरिक्षा फ्रंटसीट २६
  विदाऊट लायसन्स ११
  फॅन्सी नंबर प्लेट
  जम्पिंग सिग्नल १३५
  एकूण ५४०

  अशा एकूण ५४० जणांवर बडगा उगारत दंडात्मक कारवाईत एकूण तब्बल ४ लाख १ हजार ३५० रू दंड आकरण्यात आला.

  तसेच शुक्रवारी ड्रंक अँड ड्राईव्ह मधील सहा मद्यपी वाहन चालकांना न्यायालयात हजर केले. त्यापैकी चार मद्यपी वाहन चालकांना प्रत्येकी दहा हजार रुपये दंड व त्यांचे वाहन चालवण्याचे लायसन्स सहा महिन्यांकरिता निलंबित करण्यात आले व दोन मद्यपी वाहन चालकांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये दंड असा एकूण ७० हजार रुपये दंड व चार वाहन चालकांचे लायसन्स सहा महिन्यांकरिता निलंबित करण्यात आले असल्याची महेश तरडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर वाहतूक उपशाखा कल्याण यांनी दिली. वाहतूक शाखेच्या कारवाईच्या बडग्याने वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांचे धाबे दणाणल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.