कृषी विद्यापीठ दगडफेकप्रकरणी कारवाई होणार; वारंवार होणाऱ्या घटनांची दखल घेणे गरजेचे

महात्मा फुले कृषी विद्यापीठच्या विद्यार्थांच्या वसतिगृहात अनाधिकृतपणे वास्तव्य कारणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दगडफेक करण्यात आल्याने परिसरात दहशत पसरली असून, हा गंभीर प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला.

  राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठच्या विद्यार्थांच्या वसतिगृहात अनाधिकृतपणे वास्तव्य कारणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दगडफेक करण्यात आल्याने परिसरात दहशत पसरली असून, हा गंभीर प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला. यापूर्वी दोन वेळा घडलेल्या घटनेतून बोध न घेता विद्यापीठ प्रशासनाने अनधिकृत कारभार सुरु ठेवल्याने तिसऱ्या वेळेस विद्यार्थ्यामध्ये चकमक उडाली, वारंवार घडणाऱ्या या घटनेमुळे एखादी गंभीर घटना घडू नये म्हणून अनधिकृत विद्यार्थ्यांच्या विरुद्ध पोलिसांकडे तक्रार करून कारवाई करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने आता घेतला आहे.

  स्थानिक विदयार्थ्यांचे विदयापीठ प्रशासनाला वावडे?

  अनधिकृत राहणारे विदयार्थी हे बहुतांशी महाराष्ट्र राज्याचे असल्याचे सांगत परशासन या घटनेवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत असले तरी विद्यापीठ प्रशासनाला स्थानिक जिल्यातील विद्यार्थ्यांचे मोठे वावडे असल्याचे अनेकदा जाणवले आहे. स्थनिक विदयार्थ्यांना वसतिगृह,अभ्यासिका सोडा पण खेळाच्या मैदानवर सुद्धा जाऊ दिले जात नसल्याचा आरोप स्थानिक विद्यार्थ्यांनी केला आहे.

  विद्यापीठ वसतिगृहात ५०० अनधिकृत विद्यार्थ्यांना राहू देण्यासाठी म्हणून टेबल खालून मोठा व्यवहार केला जात असावा, असा संशय असून त्याकामी मोठे रॅकेट येथे कार्यरत असावे, म्हणूनच रात्री घडलेली दगडफेकीची घटना दडपणेसाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत आहे,याची उच्चस्तरिय चौकशी करावी.

  अप्पासाहेब ढूस, अध्यक्ष, प्रहार संघटना

  विदयार्थ्यांचे आपसातील किरकोळ वादातून घटना घडली असली तरी घटनेचे गांभीर्य ओळखून विद्यापीठ प्रशासनाने तातडीची बैठक घेऊन याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस उपाधिक्षक यांच्या उपस्थितीमध्ये उद्या बैठक होऊन त्यातून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

  – महानंद माने, कुलमंत्री, वसतिगृह

  विद्यापीठ प्रशासना कडून कोणतीही तक्रार अजून प्राप्त झाली नाही, तक्रार आल्यास सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात येईल.

  – प्रताप दराडे, वरिष्ठ पोनि, राहुरी