MPDA's action against persistent criminals in Pune
MPDA action against terrorizing pune criminals

  पुणे : जनता वसाहत तसेच परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्तांनी एमपीडीएनुसार कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ही तब्बल ९६ वी कारवाई आहे. त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. शुभम प्रमोद शिंदे (वय २६, रा. मध्यवर्ती मंडळाजवळजनता वसाहत) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे.

  गंभीर गुन्हे दाखल

  शुभम शिंदे हा पर्वती पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने विश्रामबाग व पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवली आहे. साथीदारांसह तो चाकूकोयतायासारख्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्नदुखापतबेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्यावर २ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

  सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा

  त्याच्या गुन्हेगारी कृत्याने परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. आरोपी शुभम शिंदे याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी पोलीस आयुक्त यांना पाठवला होता. 

  एक वर्षासाठी स्थानबद्ध

  या प्रस्तावाची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शुभम शिंदे याला एम.पी.डी.ए.कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.