MPDA's action against persistent criminals in Pune
MPDA action against terrorizing pune criminals

    पुणे : दांडेकर पूल भागात दहशत माजविणाऱ्या गुंडावर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तांची ही ७० वी कारवाई असून, त्याला अमरावती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. यश उर्फ मनोज दिनेश मेरवाडे (वय २२, दांडेकर पुल, सिंहगड रस्ता) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. मेरवाडेवर गंभीर स्वरुपाचे ४ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देत नव्हते.

    अमरावती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश

    मेरवाडेवर एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे यांनी तयार केला होता. उपायुक्त सुहेल शर्मा यांच्यामार्फत तो पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे पाठविला. पोलीस आयुक्तांनी या प्रस्तावास मंजूरी दिली. तसेच, त्याला वर्षभरासाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले.