ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक, म्हाडाच्या कार्यालयात घुसून अनिल परब यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

दरम्यान परब यांनी आपली भूमिका माडली आहे, किरीट सोमय्यांनी मराठी माणसाला या ठिकाणी राहू द्यायचं नाही, त्याचा फायदा होऊ द्यायचा नाही हे धोरण ठरवत बिल्डर्सकडून सुपारी घेतली आहे. हा किरीट सोमय्या जे काही करतो आहे त्याला भाजपाचं समर्थन आहे का? असाही प्रश्न अनिल परब यांनी विचारला आहे.

    मुंबई – शिवसैनिक अनिल परब यांच्या समर्थनार्थ मुंबईतील म्हाडा कार्यालयात घुसले आहेत. यावेळी शिवसैनिक परब यांच्या समर्थनार्थ तसेच किरीट सोमय्या याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत आहेत. माजी परिवहन मंत्री व ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे वांद्रे येथील कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले आहे. याचा निषेध कार्यकर्ते करत आहेत.

    सोमय्या जे काही करतो आहे त्याला भाजपाचं समर्थन आहे का?
    दरम्यान परब यांनी आपली भूमिका माडली आहे, किरीट सोमय्यांनी मराठी माणसाला या ठिकाणी राहू द्यायचं नाही, त्याचा फायदा होऊ द्यायचा नाही हे धोरण ठरवत बिल्डर्सकडून सुपारी घेतली आहे. हा किरीट सोमय्या जे काही करतो आहे त्याला भाजपाचं समर्थन आहे का? असाही प्रश्न अनिल परब यांनी विचारला आहे. तसंच किरीट सोमय्या इथे येऊ द्या त्याचं स्वागत आम्ही आमच्या पद्धतीने करू कारण मराठी माणसाच्या हिताच्या आड कुणी आलं तर मी आणि शिवसेना गप्प बसणार नाही असा इशाराच अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना दिला आहे.

    म्हाडावर किरीट सोमय्यांनी दबाव टाकला का ?
    नोटीसला उत्तर देताना सांगितलं की सदर जागा माझी नाही. सोसायटीची आहे. त्यानंतर मला पाठवण्यात आलेली नोटीस म्हाडाने मागे घेतली. यानंतर इमारतीतले रहिवासी कोर्टात गेले. त्यांनी सांगितलं की रेग्युलरायझेशनसाठी तुम्ही अर्ज केला. तसा अर्ज करण्यात आला. आम्ही म्हाडाला हे सांगितलं. म्हाडाने हे रेग्युलराईज करता येणार नाही सांगितलं. किरीट सोमय्यांनी त्यांच्यावर दबाव टाकला होता. त्यानंतर या जागा इमारतीने स्वतःहून मोकळ्या केल्या. गरीब मराठी माणूस या विभागात राहतो. त्यांची ही जागा आहे. ही जागा सोसायटीची आहे. म्हाडाच्या ५६ वसाहती आहेत ज्या पुनर्विकासाच्या मार्गावर आहेत. त्यात अशा प्रकारची ऑर्डर येणं आणि लोकांना मूळ घरं २२० स्क्वेअर फूटचीच घरं द्यायची या हेतून किरीट सोमय्यांना बिल्डर्संकडून सुपारी घेतली असावी असाही आरोप अनिल परब यांनी केला.