तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी अभिनेता शेजान खानला अटक, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

तुनिषा शर्माच्या आईने अभिनेता शिझान खानला (Sheezan Khan) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली .

  मुंबई :  अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी अभिनेता शिझान खानला (Sheezan Khan) अटक करण्यात आली आहे. तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी शिझान खानला विरोधात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

  अभिनेत्री टुनिशा शर्माने आत्महत्या (Tunisha Sharma Suicide) काल मालिकेचे शुटींग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. नायगावमधील स्टुडिओतील सेटवर ही घटना घडली. या प्रकरणी तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. भादवी 306 प्रमाणे वालीव पोलीस ठाण्यात (Waliv Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. तर, तुनिषा शर्मा हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात (JJ Hospital Mumbai) आण्यात आला आहे. आज (25 डिसेंबर) सकाळी पोस्टमार्टम केलं जाणार आहे.

  तुनिषाचे शिझान खानसोबत तिचे प्रेमसंबंध

  तुनिषा शर्मासोबत काम करणाऱ्या शिझान खानसोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्या नैराश्यातून तिनं हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान शिझान खानला चौकशीसाठी कालच पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. याबाबतची माहिती सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली होती. मात्र, त्यांनतर शिझान खानला अटक करण्यात आली आहे.

  आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
  अलीबाबा या मालिकेतील अभिनेता शिझान विरोधात तुनिषाच्या आईनं तक्रार दिली आहे. या प्रकरणात शिझानला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल दुपारी शिजान आणि तुनिषा या दोघांनी एकत्र त्याच्या रूममध्ये जेवण केले. त्यानंतर शिझान हा सेटवर शूटिंगसाठी गेला आणि शिझानच्या रूममध्येच तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.