Breaking News : शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी

केतकीच्या विरोधात महाराष्ट्रात प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला असून तिच्या विरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज ठाणे सत्र न्यायालयात गोरेगाव पोलिसही तिचा ताबा घेण्यासाठी हजर झाले होते.

  • गोरेगाव पोलिसही तिचा ताबा घेण्यासाठी ठाणे न्यायालयात दाखल

ठाणे : अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketaki Chitale) हिने ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात फेसबुकवर (Facebook) काल आक्षेपार्ह पोस्ट (Offensive Post) केली होती. आज सकाळी केतकीला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात (Session Court, Thane) हजर केले असता तिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे.

केतकीच्या विरोधात महाराष्ट्रात प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला असून तिच्या विरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज ठाणे सत्र न्यायालयात गोरेगाव पोलिसही तिचा ताबा घेण्यासाठी हजर झाले होते.

ठाणे न्यायालयाबाहेर जमलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आजही आक्रमक पवित्र्यातच होते. त्यांनी केतकीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली होती. ‘केतकी चितळे हाय हाय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो’ अशा घोषणांनी ठाणे सत्र न्यायालयाचा परिसर त्यांनी दणाणून सोडला होता.  या प्रकरणी तिला काल कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तिला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना आक्रमक घालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ करत तिच्यावर शाईफेक केली होती.