मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आदर्श ठेवीदारांचा मोर्चा; आंदोलक व पोलीस यांच्यात झटापट…

या बैठकीसाठी अख्खं मंत्रिमंडळ औरंगाबादमध्ये दाखल झालं आहे. दरम्यान, शहरातील आदर्श नागरी पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील देखील सहभागी झाले आहेत. पोलिसांनी हा मोर्चा अडवला आहे. यानंतर मोठा गोंधळ पाहयला मिळाला.

    छत्रपती संभाजीनगर : आज छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. (Cabinet Meeting) सात वर्षाच्या कालावधीनंतर ही बैठक होत आहे. प्राप्त प्रस्तावापैकी काही निवडक प्रस्तावांचा विचार बैठकीत होईल व विभागासाठी सुमारे ४० ते ४५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले जाईल अशी शक्यता आहे. तसेच या बैठकीसाठी अख्खं मंत्रिमंडळ औरंगाबादमध्ये दाखल झालं आहे. दरम्यान, शहरातील आदर्श नागरी पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील देखील सहभागी झाले आहेत. पोलिसांनी हा मोर्चा अडवला आहे. यानंतर मोठा गोंधळ पाहयला मिळाला.

    पोलीस-आंदोलक यांच्या झटापट…

    दरम्यान, आज मंत्रिमंडळाची बैठक होत असल्यानं १५ मोर्चे, आंदोलन तसेच काही निवेदन सरकारला देण्यात येणार आहे. दरम्यान, आदर्श नागरी पतसंस्थेचे व संचालक मंडळाच्या मालमत्तेचे लिलाव करुन गोरगरीब, वयोवृद्ध, कष्टकरी व शेतकरी ठेवीदारांचे हक्काचे पैसे देण्यात यावे, आत्महत्या केलेल्या ठेवीदारांच्या नातेवाईकांना पाच लाखाची तात्काळ मदत करण्यात यावी, तसेच रुग्णालयात भरती ठेवीदारांच्या संपूर्ण उपचाराचा खर्च शासनाने करावा तसेच महाघोटाळ्यातील फरार आरोपींना आणि त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करणारे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना अटक करण्याचे यावे. यासाठी हा मोर्चा काढण्यात आला, यावेळी पोलीस आणि मोर्चेकरी यांच्यात झटापट झाली.

    राज्य सरकारने औरंगाबाद (Aurangabad) शहरानंतर जिल्ह्याचंही नावंही बदललं आहे. आता शहरानंतर जिल्ह्याचं नाव देखील बदलून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) असं करण्यात आलं आहे. तर उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचंही नाव धाराशिव (Dharashiv) झालं आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आदर्श पतसंस्था ठेवीदारांनी मोर्चा काढला आहे. या मोर्चाला पोलिसांनी अडविले आहे. विना परवागनगी हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. प्रोपर्टी विकून ठेवीदारांचे पैसे परत करावेत, आम्हाला मंत्र्यांना भेटू द्यावे अशी मागणी आमदार जलील यांनी केली आहे. यावेळी पोलीस आणि मोर्चेकरी यांच्यात झटापट झाली.