सीईओपदाचा अतिरिक्त कार्यभार मनिषा आव्हाळे यांचेकडे सुपूर्द ; स्वामी प्रशिक्षणासाठी रवाना

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सीईओ दिलीप स्वामी यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे यांचेकडे सुपूर्द केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात विभाग प्रमुख यांचे बैठकीत आज सीईओ दिलीप स्वामी यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे यांचा आज वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना पुष्पगुच्छ व मिठाई व देऊन स्वागत केले.

    सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सीईओ दिलीप स्वामी यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे यांचेकडे सुपूर्द केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात विभाग प्रमुख यांचे बैठकीत आज सीईओ दिलीप स्वामी यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे यांचा आज वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना पुष्पगुच्छ व मिठाई व देऊन स्वागत केले. त्यानंतर त्यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला. सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामकाजा बाबत मार्गदर्शन करून त्यांनी विभाग प्रमुखांची ओळख करून दिली.

    नुतन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी सिईओ दिलीप स्वामी यांना पुष्प गुच्छ देऊन त्यांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, शिक्षणाधिकारी संजय जावीर, प्रकल्प अधिकारी जावेद शेख, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक कोळी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रभारी प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, उमेद चे अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, प्रमुख उपस्थित होते. या प्रसंगी उप शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे व उप शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी पदोन्नती मिळाले बद्दल स्वागत करण्यात आले.

    नावीन्य उपक्रमाचे सातत्य टिकवा – सीईओ दिलीप स्वामी

    जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुख यांची बैठकीत आज सीईओ दिलीप स्वामी यांनी विविध राबविलेल्या ३८ अभियानाची माहिती देऊन या उपक्रमाचे सातत्य टिकवून ठेवा. नव्याने नियोजन करून दिलेल्या उमेद अभियान अंतर्गत महिला डेअरी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना विभाग प्रमुख यांना दिल्या.