राणेंना दणका, अधीश बंगल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली

समुद्र किनाऱ्यावर हा बंगला असून सीआरझेडचे उल्लंघन करण्यात आले आहे, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्याप्रकरणी आज सुनावणी पार पडली असून, कोर्टाने नारायण राणे यांना दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

    मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. अधीश बंगल्यासंदर्भात कोर्टाने राणे यांनी याचिका फेटाळली असून, ‘सीआरझेड’चे उल्लंघन केल्याचा ठपका देखील कोर्टाने राणे यांच्यावर ठेवला आहे.

    नारायण राणे यांचा मुंबईतील जुहू भागात एक बंगला असून, तो समुद्र किनाऱ्यावर आहे. या बंगल्याचे काही एफएसआय आणि सीआरझेडचे याचे काही नियम यावर लागू होतात.

    समुद्र किनाऱ्यावर हा बंगला असून सीआरझेडचे उल्लंघन करण्यात आले आहे, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्याप्रकरणी आज सुनावणी पार पडली असून, कोर्टाने नारायण राणे यांना दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

    तसेच एफएसआय आणि सीआरझेडचे उल्लंघन केल्याप्रकरणी अवैध बांधकाम तोडण्याचे आदेश देखील कोर्टाने दिले आहे. हा नारायण राणे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो.
    मुंबई महानगर पालिकेने देखील अशाच प्रकारची एक नोटीस नारायण राणेंना दिली होती. त्यावर बीएमसीच्या टीमने पाहणी देखील केली होती. तेव्हा भाजप-शिवसेनेत मोठ्या प्रमाणात वाद देखील झाला होता.