
खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून विशेष कौतुक
सातारा : साताऱ्याची राष्ट्रीय पातळीवरची अवल तिरंदाज आदिती स्वामी हिने चीनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले तिच्या या सुवर्णवेधामुळे साताऱ्याचा नाव लौकिक पुन्हा जागतिक पातळीवर पोहोचला आहे अशा गुणवंत खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा पुरविल्यास त्यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरी होत राहील असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले
माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या पुढाकाराने आदिती स्वामीचा येथील जलमंदिर येथे खासदार उदयनराजे भोसले व दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. अदितीच्या या सुवर्ण कामगिरीमुळे उदयनराजे यांनी आदिती चे विशेष कौतुक केले.
उदयनराजे पुढे म्हणाले, क्रीडा क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा आहे. मात्र आदितीने अत्यंत जिद्दीच्या आणि एकाग्रतेच्या बळावर तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. हे कौतुकास्पद आहे साताऱ्याच्या मातीमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे जिल्हा पातळीवर त्यांना उत्तम उत्तम सुविधा मिळाल्या तर ते जागतिक दर्जाची कामगिरी नोंदवू शकतात. सुहास राजेशिर्के यांनी सुद्धा आदितीच्या या कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले आर्चरी खेळामध्ये अव्वल कामगिरी करणारी अदिती ही गुणवान खेळाडू आहे. सातत्यपूर्ण सराव व अव्वल कामगिरी होण्यासाठी साताऱ्यात क्रीडा सुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी क्रीडा विभागाकडे आपण सातत्यपूर्ण पाठपुरावा करणार असल्याचे सुहास राजेशिर्के यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी संस्कार भारती सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप चरेगावकर, विश्वनाथ भाकरे, रविंद्र माने, विजय चौगुले, रवींद्र भोकरे इत्यादी उपस्थित होते आदितीने या यशाचे श्रेय आपले आई बाबा व गुरु यांना दिले आहे.