‘आदित्य ठाकरे अजूनही ‘बच्चा’, नेहमी वडिलांच्या सोबतच फिरतो’; भाजप आमदार नितेश राणेंचा टोला

कायम वडिलांच्या पाठीशी लपणारा आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अजूनही लहान आहे, बच्चा आहे. त्यामुळे तो नेहमी वडिलांच्या सोबतच फिरतो. मी सिंहासारखा एकटा येतो. आदित्यमध्ये एवढी हिंमत आहे का? अशी फटकेबाजी करत नितश राणेंनी हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी टोलेबाजी केली.

    नागपूर : कायम वडिलांच्या पाठीशी लपणारा आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अजूनही लहान आहे, बच्चा आहे. त्यामुळे तो नेहमी वडिलांच्या सोबतच फिरतो. मी सिंहासारखा एकटा येतो. आदित्यमध्ये एवढी हिंमत आहे का? अशी फटकेबाजी करत नितश राणेंनी हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी टोलेबाजी केली.

    राणे म्हणाले, तो म्हणतो की तो 32 वर्षांचा आहे. तर त्याला मी विचारू इच्छित आहे, की सांगा दिशा सालियन बलात्कार प्रकरणात तुमची भूमिका काय? दिशा सालियन घटनेच्या वेळी दिशा आणि आदित्यचे मोबाईल टॉवर लोकेशन एकच होते. हे कसे याचे उत्तर त्याने द्यावे. रोहित राजकारणात मास्टर असला तरी उद्याच्या संघर्ष प्रवासाची भीती मला नाही. मराठ्यांना बदनाम करण्याचे कृत्य केले जात आहे. त्यामुळे गोपीचंद पाडळकर यांच्यावर चप्पल फेकण्यासारखी कृती केली जात आहे. आम्ही 52 यात्रा काढल्या पण इतर समाजाचे कधीही नुकसान केले नाही. हाच खरा मराठा धर्म आहे.

    नवाब मलिक यांना आमच्या पक्षात स्थान नाही. त्याच्यावर देशद्रोहाच्या आरोपाचे पुरावे आहेत. प्रफुल्ल पटेल आणि मलिक यांची प्रकरणे वेगळी आहेत. उद्धव यांनी लंडनमध्ये इक्बाल मिर्ची यांच्यासोबत डिनर केले. आमची छेड काढली तर तेफोटो आम्हाला उघड करायला वेळ लागणार नाही.

    ‘लव्ह जिहाद’वर राणे म्हणाले, वर्ध्याच्या लव्ह जिहाद प्रकरणात माझ्याकडे व्हॉट्सअॅप चॅट आहे. या प्रकरणात मुलगा मुलीला पोलिसात न जाण्याची धमकी देत आहे. लव्ह जिहादवर कायदा असेल तर त्याच्यावर कारवाई केली जावी.