
दिशा सालियन (Disha Salian), सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई : दिशा सालियन (Disha Salian), सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याचिकाकर्ते राशिद खान पठाण यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंवर १९ हजार ७० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा केला असून, यादाव्यासंदर्भात नोटील पाठविली आहे.
उच्च न्यायालयातील शपथपत्रांमध्ये खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. यासोबतच याचिकाकर्ते आणि साक्षीदारांकडून उत्तर प्रदेशात केस दाखल करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
दिशा आणि सुशांत हत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यातील सहभागाचे सबळ पुरावे उपलब्ध आहेत, तरीदेखील कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने आदित्य यांना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात यावेत, यासाठी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याचिकेमध्ये आदित्य यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करून त्यांचेसुद्धा म्हणणं ऐकावं आणि त्यांनादेखील उत्तरवादी बनवावं, अशी मागणी केली आहे.