गद्दार सरकारमध्ये लोकशाही राहिली नाही, आदित्य ठाकरेंनी घेतले सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश दर्शन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमदार वैभव नाईक यांच्या आरोदा निवासस्थानी गणेश दर्शनानंतर काही ठिकाणी गणेश दर्शन घेतले.

    सिंधुदुर्ग : २१ राज्यात खोके सरकार संपले आता गद्दार सरकार सुरू झाले आहे, आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, जनता आमच्या पाठीशी आहे असे मत व्यक्त करत शिवसेना उद्धव ठाकरे युवा सेनेचे राज्याध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या राज्यात, देशात लोकशाही राहिली नाही जिल्ह्यापरिषद महानगरपालिका निवडणूका घेत नाहीत, ४० आमदार ही एकाकी पडल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.

    कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश दर्शनासाठी उद्धव ठाकरे युवा सेनेचे नेते आणि राज्याध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी खासदार विनायक राऊत यांच्या घरी गणेश दर्शन घेतले व त्यानंतर तेथे सुरु असलेल्या वाघेरी येथील महामहेश्वरी प्रासादिक भजन मंडळाचा आस्वाद घेतला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, अतुल राव राणे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक, मधुकर राऊत, माजी महापौर दत्ता दळवी तळगांव सरपंच श्रीमती खोत आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दुपारी खासदार विनायक राऊत यांच्या निवासस्थानी आदित्य ठाकरे यांचे गणेश दर्शन झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले पुणे, मुंबई व अन्य भागात गणेश दर्शनासाठी आपण गेलो. परंतु कोकणातील गणेश उत्सव याला पारंपारिकतेची जोड आहे येथील भजन कला आणि गणेशोत्सवातील भाविक भक्त तल्लीन होऊन जातात पावसाने काही प्रमाणात पसंती नंतर आता जोर धरला आहे.

    शेतकरी बळीराजा सुखी व्हावा यासाठी पाऊस महत्त्वाचा आहे. गेले दोन वर्षे नंतर खोके सरकार व आता गद्दार सरकार सुरू झाले आहे. या घटनाबाह्य सरकारने आणि केंद्रातील सरकारमध्ये लोकशाही उरली नाही. जिल्हा परिषदा, महानगरपालिका आणि नगर परिषदा, पंचायत समिती यांच्या निवडणुका अद्याप होऊ शकल्या नाहीत हे घटनाबाह्य सरकार देशाची आणि राज्याची उधळपट्टी करत आहे. आम्ही सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे हा देश भाजपचा नाही सर्वांचा आहे, केंद्र सरकारने नुकतेच महिला आरक्षण धोरण मंजूर केले हे महिला आरक्षण धोरण पूर्वीच्या सरकारमध्येही झाले होते असे ठाकरे म्हणाले. मुंबई गोवा महामार्ग अद्यापही नादुरुस्त अवस्थेत असल्याच्या प्रश्नावर हे सरकार महामार्ग सुचित करू शकत नाही. अनेक आंदोलने होत आहेत चिपी विमानतळ आमच्या सरकारच्या काळात झाले शिरोडा येथे होणारा पर्यटन ताजप्रकल्प १९९३-९४ पासून प्रश्न प्रलंबित आहे तो पूर्ण होईल प्रयत्न असताना आमचे सरकार गेले हे सरकार कोकणासाठी दुजाभाव करत आहे. पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष करत आहे. कोकणातील रस्ते दुरावस्थेत आहेत बारसू येथे होऊ घातलेला प्रकल्प जनतेला आवश्यक असेल तर आमचे काही म्हणणे नाही. जनतेचे मत घेऊन तो प्रकल्प करा अशी आमची मागणी आहे.

    महिला आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे परंतु या सरकारच्या काळात शिवीगाळ गद्दारी अत्याचार करणारे काही गद्दार सरकारमध्ये आहेत. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. बारसूमध्ये लाठीचार्ज होतात असे या सरकारमध्ये आहेत. राज्यातील सरकार खोके सरकार संपले असून आता गद्दार सरकार सुरू झाले आहे. चाळीस लोक एकटे पडले असून बाकीची जनता आमच्या पाठीशी आहे जवळ आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी वरळीतून लढण्यापेक्षा मी ठाण्यातून लढतो असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमदार वैभव नाईक यांच्या आरोदा निवासस्थानी गणेश दर्शनानंतर काही ठिकाणी गणेश दर्शन घेतले व त्यानंतर खासदार विनायक राऊत यांच्या निवासस्थानी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे आले होते. प्रारंभी सुवासिनींनी ओवाळून खासदार विनायक राऊत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच शिवसेनेच्या वतीने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही स्वागत केले.