
हिंमत असेल तर विधानसभा निवडणुका, पालिका निवडणुका घ्या. लवकरात लवकर निवडणूक लावावी. आता मुख्य गोष्ट ही आहे की हिंमत असेल तर निवडणुकीला सामोरे यावं. 40 गद्दारांच्या मतदारसंघात निवडणुका घ्या, असे आव्हान आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले आहे.
मुंबई: विधान परिषद निवडणुकीचा निकाल (MLC Election Result) काल लागला. भाजपच्या बालेकिल्ल्यात नागपूर (Nagpur) मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले विजयी झाले आहेत. कोकणातून महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. तर, बहुचर्चित नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आघाडीवर आहेत. तर मविआचे आणखी एक उमेदवार म्हणजे राष्ट्रवादीचे विक्रम काळे हे देखील विजयी झालेय दरम्यान, या निकालानंतर यावर आमदार व युवासेनाप्रमुख नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. निवडणुकीत हार-जीत असते. पण, हिंमत असेल तर विधानसभा निवडणुका, पालिका निवडणुका घ्या. लवकरात लवकर निवडणूक लावावी. आता मुख्य गोष्ट ही आहे की हिंमत असेल तर निवडणुकीला सामोरे यावं. 40 गद्दारांच्या मतदारसंघात निवडणुका घ्या, असे आव्हान आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
निवडणुकीत हार जीत सुरूच राहाते, असं ठाकरे म्हणाले. पण हिंमत असेल तर विधानसभा आणि महापालिका निवडणुका घेऊन दाखवा. त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी निवडणुकीला सामोरे जावं. 40 गद्दारांच्या मतदारसंघात निवडणुका घेऊन दाखवा असं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी या सरकारला दिलं आहे. आपल्या राज्यात, देशात आणि आपले मुंबईमध्ये लोकशाही आहे की नाही हा विचार आता मनात येईल. कारण जसं एक आपण बघताय की महापालिकेत असे हुकूमशाहीचं वातावरण आहे. या राज्यात देखील तसेच सुरू आहे.
सत्ताधारी पक्षाला चपराक
दरम्यान, आजचा निकाल म्हणजे सत्ताधारी पक्षाला चपराक आहे. पदवीधर आणि शिक्षक हा दोन्ही वर्ग आमच्या पाठीशी आहेत. नागपूरसारखी जागा देखील अडचणीत आलेली आहे. कोकणचे उमेदवार जरी जिंकले असतील तरी ते शिवसेनेचेच होते. कोकणचे जिंकलेली उमेदवार उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे होते. सत्यजित तांबे हे काँग्रेस पक्षाचे युवकांचे अध्यक्ष होते. तांब्यांचे अख्ख घराणं काँग्रेसचच आहे. पण हिंमत असेल तर विधानसभा आणि महापालिका निवडणुका घेऊन दाखवा. 40 गद्दारांच्या मतदारसंघात निवडणुका घेऊन दाखवा असं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला दिलं आहे.