Administration ready for election in Maval Assembly Constituency

  वडगाव मावळ : मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत २०४ मावळ विधानसभा क्षेत्रात निवडणूक प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली आहे.

  २०४ मावळ विधानसभा क्षेत्रात एकूण ३ लाख ७३ हजार ३०८ एवढी मतदार आहेत. यामध्ये पुरुष १ लाख ४२ हजार ३२८ व स्त्रिया १ लाख ३७ हजार ४६२ तसेच तृतीयपंथी १३ मतदार आहेत.

  संवेदनशील मतदान केंद्र

  याकरिता एकूण ३९० मतदान केंद्र आहेत यापैकी वाडीवले एक हे संवेदनशील मतदान केंद्र आहे व जांभूळ येथील एक महिला मतदान केंद्र व वडगाव येथील एक युवा मतदान केंद्र तसेच लोणावळा येथील कॉन्व्हेंट स्कूलमधील एक आदर्श मतदान केंद्र आहे. सर्व मतदान केंद्रांवर मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

  जास्त मतदार चिठ्ठ्यांचे वाटप

  BLO यांनी ९० % पेक्षा जास्त मतदार चिठ्ठ्यांचे वाटप केले असले तरी, प्रत्येक मतदान केंद्रावर एक बीएलओ मतदारांच्या मदतीकरिता नियुक्त करण्यात आला असून अशी एकूण ३९० BLO यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  निवडणुकीकरिता एकूण ३९० पथके
  त्याचबरोबर दिनांक १२ पासून एक सुरक्षा कर्मचारी प्रत्येक केंद्रनिहाय नियुक्त करण्यात आलेला आहे. निवडणुकीकरिता एकूण ३९० पथके असून केंद्रांवरील एकूण १८०६ राखीव सह कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सर्व पथकांवर व केंद्रांवर समन्वय व सहनियंत्रणाकरिता ४५ सेक्टर अधिकारी यांची नेमणूक केली आहे.

  तृतीय प्रशिक्षण व मतदान साहित्य वाटप

  दि १२ रोजी, सकाळी ८ वाजल्या पासून नूतन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे येथून ४५ टेबल व सेक्टर अधिकाऱ्याद्वारे तृतीय प्रशिक्षण व मतदान साहित्य वाटप करण्यात येणार आहे .

  केंद्रनिहाय प्राथमिक उपचार पेटी व ORS पाकीट वाटप
  निवडणूक साहित्य बरोबरच प्रत्येक केंद्रनिहाय प्राथमिक उपचार पेटी व ORS पाकीट वाटप करण्यात येणार आहे, त्याचबरोबर आशा सेविकांची देखील मतदान केंद्रनिहाय नेमणूक केलेली आहे, तसेच आरोग्य यंत्रणेमार्फत प्रत्येक आरोग्य केंद्रात मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवा कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.

  बसेस द्वारे मतदान केंद्रांवर पोहोचणार

  सर्व मतदान केंद्र पदके आपापल्या केंद्रांवर त्याच दिवशी बसेस द्वारे मतदान केंद्रांवर पोहोचणार आहेत त्याकरिता ८० बसेस ची व्यवस्था करण्यात आली असून सर्व बसेसला जीपीएस व पोलीस सुरक्षा देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर फर्निचर पाणी व इतर सुविधा पुरविण्यात आले असून सर्व नगरपालिका ग्रामपंचायत सर्कल तलाठी कोतवाल पोलीस पाटील यांना याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

  सर्व मतदान केंद्रनिहाय पथकांवर ४५ सेक्टर

  सर्व मतदान केंद्रनिहाय पथकांवर ४५ सेक्टर अधिकाऱ्याद्वारे समन्वय व सनियंत्रण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नूतन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग तळेगाव येथे मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे नियंत्रण कक्षात एकूण ४५ अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे हा नियंत्रण कक्ष सेक्टर अधिकारी त्यांच्या संपर्कात राहून प्रत्यक्ष मतदान केंद्रा वरील सूचना माहितीची देवाण-घेवाण करणार आहे.

  त्याचबरोबर एक संगणकीय कक्ष संगणक प्रणालीमध्ये सेक्टर अधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन संगणक प्रणालीत नोंदवणार आहे. प्रत्येक सेक्टर ऑफिसर यांच्याकडे एक राखीव मतदान यंत्र असणार आहे. तसेच एक ईव्हीएम पथक पर्यायी ईव्हीएम व तांत्रिक कर्मचारी उपलब्ध करून देणे करिता नियुक्त करण्यात आलेला आहे.

  मतदानाच्या दिवशी सकाळी सर्व मतदान केंद्रनिहाय मॉक पोल पार पाडून प्रत्यक्ष ७ वाजता मतदानाला सुरुवात करण्यात येणार आहे व सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.

  मूलभूत सोईसुविधा उपलब्ध

  सर्व मतदान केंद्रांवर व्हीलचेअर पाणी स्वच्छतागृह इत्यादी मूलभूत सोईसुविधा उपलब्ध असणार आहेत. दर दोन तासांनी मतदान केंद्र अध्यक्ष सेक्टर अधिकाऱ्यांद्वारे नियंत्रण कक्षा मतदानाची आकडेवारी मतदान केंद्राबाहेर १०० मीटर व २००मीटर अशा हद्दी खुणा असणार आहेत,

  सर्व आठवडे बाजार बंद
  मतदानाच्या दिवशी सर्व आठवडे बाजार बंद असणार आहेत. अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत मावळ मुळशी यांनी दिली. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

  २०४ मावळ विधानसभा मतदारसंघ

  एकूण मतदार – 3 लाख 73 हजार 408
  पुरुष मतदार – 1 लाख 91 हजार 702
  स्त्री मतदार – 1लाख 81 हजार 693
  तृतीयपंथी मतदार – 13
  मतदान केंद्र – ३९०
  केंद्रस्तरीय अधिकारी(BLO) – ३९०
  मतदान अधिकारी/कर्मचारी – १८०२ (राखीवसह)
  सेक्टर ऑफीसर – ४५
  संवेदनशील मतदान केंद्र- वाडीवले
  युवा संचलित मतदान केंद्र – RK शाळा वडगाव,महिला संचलित केंद्र – ११८ जांभूळ