Administrator on 62 Gram Panchayats in Dahanu

डहाणू तालुक्यात एकूण ८५ ग्रामपंचायती आहेत. त्यातील ६२ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जुलै २०२१ अखेरीस संपला असून ग्रामपंचायत वरील कार्यकारिणी कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. जुलै २०२१ पासून ६२ ग्रामपंचायतींचा कारभार हा ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व प्रशासक यांच्या खांद्यावर सोपवण्यात आला आहे(Administrator on 62 Gram Panchayats in Dahanu).

  डहाणू : डहाणू तालुक्यात एकूण ८५ ग्रामपंचायती आहेत. त्यातील ६२ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जुलै २०२१ अखेरीस संपला असून ग्रामपंचायत वरील कार्यकारिणी कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. जुलै २०२१ पासून ६२ ग्रामपंचायतींचा कारभार हा ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व प्रशासक यांच्या खांद्यावर सोपवण्यात आला आहे(Administrator on 62 Gram Panchayats in Dahanu).

  पंचायत समितीमधील विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची ग्रामपंचायत प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली असून प्रत्येक अधिकाऱ्याला ३ ते ४ ग्रामपंचायतींचा कारभार सोपवून दिला आहे.

  प्रशासकांना पंचायत समितीची कामे करताना ग्रामपंचायतींना पुरेसा वेळ देता येत नाही. त्यातच प्रत्येकी तीन ते चार ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळण्यात त्यांची दमछाक होत असेल, यात शंका नाही. ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजासाठी प्रशासकाची सही हवी असल्यास ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिकांनाच पंचायत समिती कार्यालय गाठावे लागत असल्याचे दिसत आहे.

  ग्रामपंचायतीमधूनच प्रशासकाची सही हवी असेल तर अनेक दिवस वाट पाहावी लागत आहे. ग्रामसभांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे गाव-पाड्यांतील प्रश्न ग्रामपंचायतीपर्यंत पोहचत नसून ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लागण्यास विलंब होत आहे. कार्यकारिणी नसल्यामुळे ग्रामपंचायतींची कारभार संथ गतीने सुरू आहे. नजीकच्या १० ते १५ वर्षांत ६२ ग्रामपंचायतींवर तब्बल एक वर्षापर्यंत प्रशासक बसण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

  ग्रामपंचायत कार्यकारिणी कमिटी बरखास्त होऊन एक वर्ष पूर्ण होत आले आहे. अशात ग्रामपंचायतींचा कारभारास अडचणी येत आहेत. डिसेंबरपर्यंत ग्रामपंचायत निवडणुका होणे अपेक्षित होते. परंतु काही कारणास्तव डिसेंबरमध्येही निवडणुकांचा मुहूर्त निघाला नाही.

  लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभारासाठी अनेक अडचणी निर्माण होत असून लवकरात लवकर ग्रामपंचायतीच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत. तर सध्या ग्रामपंचायतींची वार्ड रचना सुरू असून लवकरच निवडणुका घेतल्या जातील, अशी माहिती संबंधित प्रशासनाकडून देण्यात आली आहे.