मोदींच्या कार्यक्रमास प्रसिद्धीसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून सरकारी पैशांतून जाहिरातबाजी, जनतेच्या पैशांची लूट; काँग्रेसचा गंभीर आरोप

ते प्रकल्प आधी परत राज्यात आणा, तसेच देशाच वाढती महागाई, बेरोजगार, यावर देखील पंतप्रधानांनी कधीतरी बोलावे, अशी टिका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे समुद्रातील स्मारकाचे भूमीपूजन करुन सहा वर्ष झाली, त्याचे पुढे काय झाले?

    मुंबई- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendr Modi) मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी मुंबईत येत आहेत. परंतु भाजप (BJP) सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnvis government) मुंबईकरांची दिशाभूल आणि फसवणूक करत आहेत, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून सरकारी पैशांतून जाहिरातबाजी केली जात आहे, तसेच जनतेच्या पैशांची लूट शिंदे-फडणवीस सरकार करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

    ज्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन करत आहे, त्यामध्ये भाजपचे आणि शिंदे फडणवीस सरकारचे काही योगदान नाही. काही प्रकल्प आणि योजना काँग्रेसचे (Congress) सरकार असताना आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना मंजूर करून काम सुरू केले गेले आहे. शिंदे फडणवीस सरकार हे 50 खोके सरकार आहे, अवैधरीत्या व बेकायदेशीर सरकार आहे आणि हे सर्व जनतेला माहित आहे. अशी टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

    दरम्यान, राज्यातील प्रकल्प अन्य राज्यात पाठवणे, हे या सरकारचे काम आहे. ते प्रकल्प आधी परत राज्यात आणा, तसेच देशाच वाढती महागाई, बेरोजगार, यावर देखील पंतप्रधानांनी कधीतरी बोलावे, अशी टिका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे समुद्रातील स्मारकाचे भूमीपूजन करुन सहा वर्ष झाली, त्याचे पुढे काय झाले? असा सवाल देखील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

    आगामी मनपा निवडणुक आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिंदे फडणवीस सरकारला कोणी मते देणार नाही, त्यांचा पराभव अटळ आहे हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे. म्हणून ते सर्व निवडणुका पुढे ढकलत आहेत आणि म्हणूनच फक्त प्रसिद्धीसाठी आणि जनतेची दिशाभूल आणि फसवणूक करण्यासाठी मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले जात आहे, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केला. भाई जगताप पुढे म्हणाले की, मुंबईतील मेट्रो प्रकल्प व योजना काँग्रेसचे सरकार असताना आम्ही सर्व मंजूर करून काम सुरू केले, निधी उपलब्ध केला आणि आता हे भाजप सरकार श्रेय घेत आहेत. भाजप आणि शिंदे फडणवीस सरकारचे काहीच योगदान नाही.