संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली असून वकिल गुणरत्न सदावर्तेही अयोध्येचा दौरा करणार आहेत. आपण राम जन्मभूमीच्या केसमध्ये वकील होतो. त्यामुळे आपल्याला अयोध्येतून बोलावणे आले आहे, असे सांगत आपण लवकरच अयोध्येला जाणार असल्याचे गुणरत्न सदावर्तेंनी जाहीर केले आहे(Advocate Gunaratna will also go to Ayodhya forever).

    मुंबई : महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली असून वकिल गुणरत्न सदावर्तेही अयोध्येचा दौरा करणार आहेत. आपण राम जन्मभूमीच्या केसमध्ये वकील होतो. त्यामुळे आपल्याला अयोध्येतून बोलावणे आले आहे, असे सांगत आपण लवकरच अयोध्येला जाणार असल्याचे गुणरत्न सदावर्तेंनी जाहीर केले आहे(Advocate Gunaratna will also go to Ayodhya forever).

    गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, एसटी बँक कर्मचाऱ्यांच्या निवडणुकीमध्ये मी पॅनल उभा करणार असल्याने मला पुन्हा नोटीस पाठवण्यात आले आहे. बँकमधील सत्ताधारी पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने त्यांनी मला नोटीस पाठविली असल्याचे वक्तव्य प्रसारमाध्यमांशी बोलतांना सदावर्ते यांनी केले आहे.

    एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते अटक असताना त्यांच्याविरोधात गावदेवी पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यामुळे गावदेवी पोलीस सदावर्तेंची चौकशी करणार आहेत. पोलिसांनी सदावर्तेंना ११० अंतर्गत नोटीस पाठवली आहे. आज यासंदर्भात गुणरत्न सदावर्ते यांचे वकील गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नोटीसला उत्तर देण्याकरीता वेळ मागितला. त्यांना १० जूनपर्यंत वेळ देण्यात आला आहे, अशी माहिती सदावर्ते यांच्या वकिलांनी दिली.

    खासदार शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याला सदावर्तेंना जबाबदार धरून अटक करण्यात आले होते. या प्रकरणा १६ दिवस जेलमध्ये रहावे लागले. त्यानंतर जामीनावर त्यांची जेलमधून सुटका झाली. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी एसटी कष्टकरी जनसंघ ही नवी संघटना स्थापन करुन सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. नव्या संघटनेची घोषणेला ४८ तासही उलटलेले नाहीत, तोपर्यंत पोलिसांनी त्यांना नवी नोटीस पाठवली आहे.

    गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई गावदेवी पोलिसांकडून ११० अंतर्गत तीन पानाची नोटीस पाठवण्यात आली आहे. आम्ही आज पोलिसांना सांगितले की, आम्हाला यावर उत्तर सादर करण्याकरीता काही वेळ हवा आहे. त्यानुसार आम्हाला वेळ देण्यात आला आहे. १० जून रोजी नोटीस उत्तर देण्याचे सांगण्यात आले आहे. सदावर्ते यांच्यावर करण्यात आलेली कारवाई राजकीय हेतूने करण्यात आली आहे, असे सदावर्ते यांच्या वकिलांकडून सांगण्यात आले आहे.