विवाहित तरुणीशी प्रेमसंबंध, जीव देण्याची धमकी देऊन अत्याचार; आरोपीवर गुन्हा दाखल

विवाहित तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण करून जीव देण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. तर, या तरुणीला नग्न फोटो व व्हिडीओ (Video) व्हायरल (Viral) करण्याची धमकी देत ब्लॅकमेल देखील केले. याप्रकरणी हडपसर पोलीस (Hadapsar Police) ठाण्यात रांजणगाव येथील अतुल नानाभाऊ शिंदे याच्यावर बलात्कार व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पुणे : विवाहित तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण करून जीव देण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. तर, या तरुणीला नग्न फोटो व व्हिडीओ (Video) व्हायरल (Viral) करण्याची धमकी देत ब्लॅकमेल देखील केले. याप्रकरणी हडपसर पोलीस (Hadapsar Police) ठाण्यात रांजणगाव येथील अतुल नानाभाऊ शिंदे याच्यावर बलात्कार व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २१ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. हा प्रकार २०२० ते जानेवारी २०२३ या कालावधीत घडला आहे.

    तक्रारदार या विवाहित असतानाही अतुलने प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर त्यांना नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले. त्यांना एका खोलीवर जबरदस्तीने ठेवून त्याठिकाणी जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तरुणीने सुटका करून घेत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.