eknath shinde

बीडमधील अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. जिल्हाप्रमुख राहिलेले सचिन मुळूक आणि कुंडलिक खांडे यांच्यावर शिंदे गटाच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुखांची जबाबदारी पुन्हा एकदा देण्यात आलीय. मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

    बीड : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक बदल झाले आहेत. सत्तांतर नंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट पडले. नुकतच अकोल्यात शिवसेनेत फूट पडल्याची बातमी ताजी असतानाच आता बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे.

    बीडमधील अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. जिल्हाप्रमुख राहिलेले सचिन मुळूक आणि कुंडलिक खांडे यांच्यावर शिंदे गटाच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुखांची जबाबदारी पुन्हा एकदा देण्यात आलीय. मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

    दरम्यान, अकोल्यात गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह त्यांचे हिंगोली येथील आमदार पुत्र विप्लव बाजोरिया आणि माजी 26 नगरसेवकांनी शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला आहे.